ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी – तळेरे राष्ट्रीय महामार्गवरील कोकिसरे बेळेकरवाडी येथे ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. मंगळवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास ही घटना घडली. जोयताराम हेमाजी सोळंकी 27 राहणार पितापुरा तालुका वडगाव जिल्हा जालोर राज्यस्थान असे मयत तरुणाचे नाव आहे. सोळंकी हा कोकिसरे नारकरवाडी येथील महादेव मार्बल मध्ये कामगार म्हणून काम करत होता. त्यांनी सोबतच्या कामगाराला आपण बाजारात जाऊन येतो असे सांगून एक्टिवा गाडी घेऊन तो दुकानातून निघाला होता. बेळेकर वाडी येथील शिरावडेकर पेट्रोल पंपा समोर आला असता समोरून येणाऱ्या ट्रकने क्रमांक MH09 CU 1917 त्याला जोराची ठोकर  दिली. यात त्याच्या डोकीला गंभीर दुखापत होऊन मोठा रक्तस्त्राव झाला.या धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर सोळंकी याला येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले  मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. या अपघातानंतर अज्ञात ट्रकचालकाने घटनास्थळावरून पलायन केले आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या अपघाताची खबर सोळंकी यांचा मित्र धर्माराम जबरा राम राणा त्यांनी पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार अपघाताची पोलीस ठाण्यात नोंद घेण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. या अपघातानंतर सोळंकी याचे नातेवाईकानी  पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. मिळालेल्या माहितीनुसार सोळंकी हा गेली दोन वर्षे महादेव मार्बल या दुकानात कामाला होता. तो विवाहित  असून त्याला पत्नी व मुलगा असल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली.

error: Content is protected !!