देवगड (प्रतिनिधी): देवगड जामसंडे खाकशीवाडीचे सुपुत्र,श्री.स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचलित श्री.स्वामी समर्थ मठ हडपीड देवगडचे संस्थापक सचिव अक्कलकोट भूषण श्री.नंदकुमार तुकाराम पेडणेकर यांना त्यांच्या आध्यात्मिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन श्री समर्थनगरी आध्यात्मिक राज्यस्तरीय समिती अक्कलकोट यांनी २०२३ साली “स्वामीरत्न “हा पुरस्कार जाहीर केला हा पुरस्कार वितरण सोहळा पुणे येथील श्री अण्णाभाऊ साठे सभागृहात मंगळवार ३० मे २०२३ रोजी आयोजित करण्यात आला होता. या पुरस्कार वितरण सोहळ्यात स्वामी महाराज वटवृक्ष देवस्थान अक्कलकोटचे अध्यक्ष सन्माननीय श्री महेशराव कल्याणराव इंगळेसाहेब आणि चोळाप्पा महाराजांचे वंशज वे.शा. सं. श्री अन्नु गुरुजी यांच्या हस्ते नंदकुमार तुकाराम पेडणेकर यांना स्वामी रत्न पुरस्कार २०२३ देऊन सपत्नीक गौरविण्यात आले. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई श्री स्वामी समर्थ मठ हडपिड तसेच स्वामीभक्त परिवार यांच्या वतीने तसेच मित्र परिवारातून पेडणेकर यांचे अभिनंदन करण्यात आले
स्वामीरत्न पुरस्काराने नंदकुमार पेडणेकर सन्मानित










