पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने महिलांना लोरे नं 2 ग्रा पं ने केले सन्मानित

वैभववाडी (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने लोरे नं 2 गावातील सुनंदा आकाराम मांजलकर आणि दर्पणा दशरथ बोबकर यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महिला बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या सहीचे प्रशस्तीपत्र देऊन विशेष सन्मान करण्यात आला. लोरे नं 2 ग्रामपंचायत मध्ये सरपंच विलास नावले यांच्या हस्ते मांजलकर आणि बोबकर यांना प्रशस्तीपत्र आणि शाल देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी सर्व ग्रा पं सदस्य रितेश सुतार, सर्व ग्रा पं सदस्य, ग्रामसेवक काळे, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. यावेळी बोलताना सरपंच नावले म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामपंचायत स्तरीय पुरस्कार सामाजिक क्षेत्रात योगदान देत महिला सक्षमीकरण साठी हातभार लावणाऱ्या महिलांना पुरस्कार देण्याचा निर्णय शासनस्तरावर घेण्यात आला आहे. त्यानुसार आज लोरे नं 2 ग्रा पं मध्ये पुरस्कार वितरण करण्यात आले.हा पुरस्कार म्हणजे गावातील कर्तृत्ववान महीलांना प्रोत्साहन आहे.ग्रा पं सदस्य रितेश सुतार यांनी पुरस्कारप्राप्त मांजलकर, बोबकर यांचे अभिनंदन केले.

error: Content is protected !!