कुडाळमध्ये लोखंडी रॉडने युवकाला मारहाण

कुडाळ (प्रतिनिधी) : राहुल मारुती राठोड (२२, रा. मस्जिद मोहल्ला, रेल्वेस्टेशननजीक, कुडाळ) याला लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केल्याची घटना कुडाळ गोधडवाडी येथे सोमवारी सकाळी १०.१५ च्या सुमारास घडली. या प्रकरणी मन्सूर बाबूराव मुल्ला (२३, रा. कुडाळ-गोधडवाडी) याच्यावर येथील पोलीस अपयति गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी राहुलवर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. राहुल राठोड याने कुडाळ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, मन्सूर याने आज सकाळी १० च्या सुमारास राहुलच्या मोबाईलवर कॉल केला.. मी मुंबईहून आलो आहे. तुला अर्जंट भेटायचे आहे. तू गोधडवाडी रेल्वे ब्रीजकडे ये, असे राहुलला सांगितले. तेव्हा तो तेथे गेला असता, तू जादा शानपट्टी करू नकोस, असे सांगून गाडून टाकण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याने आपल्या. टीशर्टमध्ये लपवून ठेवलेला लोखंडी रॉड काढून राहुलच्या डोकीत मारून जखमी केले व तो पळून गेला. जखमी राहुलने येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतले व नंतर पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार भादंवि कलम ३२४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपल्याला मारहाण करण्यास मन्सूर व आपल्यात कोणताही वाद नाही किंवा कोणतेही कारण नसल्याचे याने सांगितले. तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक देवानंद माने करीत आहेत.

error: Content is protected !!