पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने प्रगती बांदल, लावण्या मेस्त्री यांचा सन्मान

वरवडे ग्रा पं मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी

कणकवली (प्रतिनिधी) : वरवडे ग्रामपंचायत मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सरपंच करुणा घाडीगांवकर यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त वरवडे गावातील प्रगती महेश बांदल आणि लावण्या लक्ष्मण मेस्त्री या कर्तृत्ववान महिलांना ग्रामपंचायत स्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. सरपंच करुणा घाडीगांवकर यांच्या हस्ते बांदल आणि मेस्त्री याना प्रशस्तीपत्र, शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी उपसरपंच अमोल बोंद्रे, ग्रामविकास अधिकारी विश्वास पावसकर, अंगणवाडी सेविका स्नेहलता सावंत, स्मिता सावंत, आशसेविका श्रुती परब, श्वेता घाडीगांवकर, विनायक घाडीगांवकर, चैताली बांदल आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!