प्रिया मुसळे व श्रध्दा केळुसकर यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्रदान

आंबेरीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

चौके ( प्रतिनिधी ) : मालवण तालुक्यातील आंबेरी ग्रामपंचायत येथे
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी आंबेरी सरपंच मनमोहन डिचोलकर यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून पूजन करण्यात आले त्यानंतर आंबेरी गावातील सौ. प्रिया सुरेश मुसळे आणि सौ श्रद्धा शरद केळुसकर या दोन महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , महिलाबालविकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या सहिचे प्रशस्तीपत्र देउन विशेष सन्मान करण्यात आला. आंबेरी सरपंच मनमोहन डिचोलकर यांच्या हस्ते शाल आणि प्रशस्तीपत्र देउन प्रिया मुसळे आणि श्रध्दा केळुसकर यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी उपसरपंच रवींद्र परब , ग्रामसेवक स्वाती कदम , सर्व सदस्य व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. ग्रामपंचायत स्तरावर सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान देत महिला सक्षमीकरणासाठी हातभार लावणाऱ्या महिलांना हा पुरस्कार देण्याचा निर्णय शासनस्तरावर घेण्यात आला आहे. या पुरस्कारामुळे कर्तुत्ववान महिलांचा योग्य सन्मान झाला आहे असे प्रतिपादन सरपंच डिचोलकर यांनी यावेळी बोलताना केले.

error: Content is protected !!