माजी ग्रामपंचायत सदस्य अनुष्का गांवकर व सीआरपी पूजा आचरेकर पुरस्काराचे मानकरी
आचरा (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत आचरा मार्फत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार 2023 चे वितरण आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीचे औचित्य साधत महिला व बालविकास यांच्या बाबत विशेष कार्यकरनार्या महिला माजी ग्रामपंचायत सदस्य अनुष्का गावकर व सीआरपी पूजा आचरेकर यांचा प्रशासक विनायक जाधव व ग्राम विकास अधिकारी प्रकाश गणपत कदम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी पोलीस पाटील जगन्नाथ जोशी, ग्रामपंचायत कर्मचारी नरेश परब, रुपेश परब, गिरीधर आपकर, सिद्धेश वराडकर, डाटा ऑपरेटर छाया कदम, सुशीला पांगे, प्रशांत गांवकर, सेजल आचरेकर तसेच बचत गट सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.













