खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण संचलित शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण या हायस्कूलच्या सन २००३ – ०४ एस एस सी बँच च्या विद्यार्थ्यांचा नुकताच गेट टुगेदर कार्यक्रम खारेपाटण हायस्कूल येथे संपन्न झाला.या कार्यक्रमात शाळेच्या या माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या आठवणी जपत. शाळेला एक वॉटर कुलर भेट दिला.
या कार्यक्रमाला खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे,संस्थेचे संचालक विजय देसाई,सिनियर कॉलेज चे प्राचार्य डॉ.ए डी कांबळे , खारेपाटण हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय सानप, पर्यवेक्षक श्री गुरसाळे,श्री कोकाटे,राजेश वारंगे, श्री शिंदे,यशवंत रयबागकर,सुबोध देसाई तसेच शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी आदी प्रमुख पदाधिकारी व माजी विद्यार्थी उपस्थित होते.शाळेच्या वतीने या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने मुख्यद्यापक संजय सानप यांनी आभार व्यक्त केले.
यावेळी खारेपाटण हायस्कूलचे सन २००३ – ०४ एस एस सी बँच चे विद्यार्थी दैववती राऊत,वसुधा गुरव, मुग्धा माईंणकर,अमित मांजरेकर, सचिन वरुणकर,संदेश पाटील,जितेंद्र कदम,शैलेश गुरव,सुनीता कर्ले, आतिका सारंग,प्रियंका चिके,पूजा कर्ले,गणपत करांडे,सोनम नाईक, रत्नप्रभा कोंदविलकर,सुचिता ब्रम्हदंडे,मयुरेश धाक्रस, सिष्मा निग्रे आदी प्रमुख विद्यार्थी उपस्थित होते. सर्वांनी शाळेच्या जुन्या आठवणींना उजाळा देत गेट टुगेदर कार्यक्रमात एकमेकांना शुभेच्छा देत सहभाग घेतला.आहे.














