पाकिस्तानी आणि खलिस्तानी समर्थकांना राष्ट्रभक्त म्हणणारे ठाकरे – राऊत देशाचे मोठे गद्दार ; आ. नितेश राणे यांचा घणाघात

राहुल गांधी अमेरिकेत जावून भारत देशाची आणि हिंदू धर्माची बदनामी करतात

डब्ल्यू एच ओ ने राऊत यांच्या चाटूगिरी करणाऱ्या जिभेचे संशोधन करावे

राहुल गांधींच्या सभेत पाकिस्तानी,खलिस्तानी आणि आय एस आय चे लोक

कणकवली (प्रतिनिधी) : खलिस्तान जिंदाबाद च्या घोषणा देणारे,पाकिस्तानच्या घोषणा देणारे, भारताच्या राष्ट्रगीताचा अपमान ज्याच्या समक्ष होतो त्या राहुल गांधीचा ज्यांना आभिमन वाटतो. अशी चाटूगिरी करणाऱ्या खासदार संजय राउत च्या जिभेचे संशोधन केले पाहिजे. राहुल गांधी यांच्या मोहबत की दुकान मध्ये हिंदूंचा अपमान करणे हा एक कलमी कार्यक्रम सुरू आहे. राहुल गांधी यांच्या कार्यक्रमात खलिस्तान जिंदाबाद च्या घोषणा दिल्या जातात. पाकिस्तानचे झेंडे फडकवत समर्थन केले जाते.अशा लोकांचे समर्थन करणारे १२ जूनला एकत्र येत असतील आणि त्यांना उबाठा सेनेचे उद्धव ठाकरे,संजय राउत,राष्ट्र भक्त म्हणत असतील तर त्यांच्या इतका गद्दार देशत दुसरा कोणी नसेल. अशी घणाघाती टीका भाजपा नेते आमदार नितेश राणे यांनी ठाकरे – राऊत यांच्यावर केली.

राहुल गांधी आणि काँग्रेस ची संजय राउत यांनी किती चाटावी ? डब्ल्यू एच ओ ने एक व्यक्ती २४ तसा चाटू गिरी कशी करू शकतो याचे संशोधन करावे. जेणे करून अशी जीभ परत होणे नाही .असा रिपोर्ट संजय राऊत यांच्या जीभेचा द्यावा.एकाद्या म्युझिअमला ठेवण्याच्या लायकीची राऊत याची जीभ झालेली आहे.अशी मिश्किल टीका आमदार नितेश राणे यांनी केली.
संजय राजाराम राऊत ला सांगेन सचिन तेंडुलकर, विराट कोहली हे देशाचा अभिमान आहेत. यांनी भारत देशाला सन्मान मिळवून दिला आहे.त्याची तुलना राहुल गांधी यांच्याशी करताना राहुल गांधी यांनी देशासाठी काय केले.तेच राहुल गांधी अमेरिकेत जावून भारत देशाची आणि हिंदू धर्माची बदनामी करत आहे. हे संजय राउत ला भांडुप मध्ये बसून कळत नाही काय ?
पंतप्रधान मोदी साहेब परदेशात गेले तेव्हा,”हिंदुस्तान जिंदाबाद..” “भारत मता माता की जय..!” अशा घोषणा दिल्या जात होत्या आणि राहुल गांधी यांच्या सभेत “खलिस्तान जिंदा बाद..” चे नारे देण्यात आले.या दोन देश प्रेमी मधला फरक आहे.
राहुल गांधी यांचे भाषण चालू असताना समोर बसलेले लोक भारताचे राष्ट्रगान सुरू असताना उभे सुद्धा राहिले नाहीत.राहील गांधी यांचे मोहबत की दुकान मध्ये हिंदूंना जागा नाही.त्यात पाकिस्तान जिंदाबाद च्या घोषणा आहेत , हिंदू देव देवतांच्या मंदीरांसमोर हिरवे झेंडे फडकवणे हेच या दुकानातून दिसते.

हिंदूंचा अपमान करणे म्हणजे मोहबत की दुकान आहे.आपण देवासमोर,आई वडिलांनी समोर साष्टांग नमस्कार करतो.त्याचा अपमान राहुल गांधी अमेरिकेत जावून करत आहेत.
मोदींच्या संस्कार आणि सभ्यतेचा नमस्कारचा, देशाचा राजदंड (सेंगोल) नवीन संसद भवनाची, खिल्ली अमेरिकेत उडवत आहेत. भारताच्या बाहेर जावून बदनामी करणार हा देशाभिमान म्हणून राऊत आणि ठाकरे यांना वाटत असेल तर दुर्दैवी आहे. राहुल गांधी जो हिंदू धर्माचा आपमान करतात तो राऊत आणि ठाकरे यांना मान्य आहे काय ? असा सवाल यावेळी केला.

राहुल गांधीच्या मोहब्बतच्या दुकानात हिंदूंनचा तिरस्कार
राहुल गांधीच्या मोहब्बतच्या दुकानात हिंदूंना स्थान नाही तर पाकिस्तान जिंदाबाद असे नारे दिले जातात.हिंदूंचा अपमान करणं म्हणजे राहुल गांधींचं दुकान आहे.राहुल गांधींच्या सभेत किती आयएसआय चे लोक होते, दहशदवादी संघटनेचे लोक होते याची माहिती राऊत यांनी घ्यावी.आणि नंतरच बोलावे.
सगळे राष्ट्रद्रोही पाकिस्तान समर्थक १२ जून ला एकत्र येत असतील आणि त्यांना ठाकरे राऊत राष्ट्रभक्त म्हणत असतील तर त्यांच्या पेक्षा मोठा गद्दार नाही.

फायर आजीच्या नातवाला नोकरी लागले काय याचे उत्तर द्या

कीर्तिकर साहेबांची तेव्हा काळजी घेतली असती तर आज हे घडलं नसत. आमदार खासदार ठाकरेंना सोडून गेले नसते.जुन्या शिवसैनिकांना तुझा मालक मुख्यमंत्री होता तेव्हा भेटला होता का ? तेव्हा कामे केली नाही आणि आता गोंजरून काय उपयोग असे आमदार नितेश राणे म्हणाले.नुकत्याच एका आंदोलनात फायार आजीने साहभग घेतला होता.त्याच्या घरी जावून ठाकरे कुटुंबानेओठ मोठी आश्वासने दिली होती त्याच काय झालं.ती आजी आजही भाजी विकते. तिच्या नातवाला नोकरी लागलीच नाही.

दुसऱ्यांच्या वडिलांची आठवण काढता उद्धवजींच्या वडिलांचे हिंदुत्व सोडलात
पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला जातोय.राऊत यांनी जो सल्ला पंकजा मुंडे ना दिला तोच सल्ला उद्धव ठाकरेना का दिला नाही. स्व.गोपीनाथ मुंडे साहेबांची आठवण काढता मग उद्धव ठाकरेंच्या वडिलांची बाळासाहेबांच्या शिकवणी आणि हिंदुत्वाची आठवण का नाही आली ?

error: Content is protected !!