वेंगुर्ले बेळगाव महामार्गावर दाणोली बाजार येथे झाड कोसळल्याने वाहतूक कोंडी

ब्युरो न्यूज (सावंतवाडी) : सावंतवाडी- वेंगुर्ले – बेळगाव महामार्गावर दाणोली बाजार येथे भले मोठे वृक्ष कोसळून रस्त्यावर पडल्याने एका तासापासून वाहतूक खोळंबली आहे.सुमारे दोन किलोमीटर पर्यंत गाड्यांच्या रांगा लागल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागला अद्याप पर्यंत जाग आली नसून वाहतूक पोलीस मात्र रस्ता सुरळीत करण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत, याबाबत ची माहिती अॅड गुरुनाथ आईर यांनी दिली.

error: Content is protected !!