मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या ६ जूनला कुडाळ दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क 

निवासी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांनी कुडाळ हायस्कूलच्या मैदानाची केली पाहणी. 

कुडाळ  (अमाेल गाेसावी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ६ जून रोजी कुडाळ – सावंतवाडीत येत असल्याने कुडाळ मध्ये “शासन आपल्या दारी” हा कार्यक्रम कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर होणार असल्याने आज या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हयाचे निवासी अप्पर उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा प्रशासन अधिकारी नगरविकास विभाग अवधूत तावडे, सावंतवाडी प्रांताधिकारी प्रशांत पानवलकर, कुडाळ प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे, कणकवली प्रांताधिकारी जगदीश कातकर, कुडाळ नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अरविंद नातू, ओरोस येथील महसूल तहसीलदार श्रीधर पाटील, कुडाळ तहसीलदार अमोल फाटक, पोलिस रूपेश सारंग, ओरोस पोलीस डिसोझा आदि शासकीय अधिकारी व काही कर्मचाऱी उपस्थित होते. तर या कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर तब्बल ७ हजार लोक बसणार आहेत. अशी माहिती यावेळी देण्यात आली.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे येत्या ६ जून रोजी सकाळी ११ वाजता हेलिकॉप्टर द्वारे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहे. दौऱ्यात “शासन आपल्या दारी” हा कार्यक्रम सावंतवाडी ऐवजी कुडाळ येथे याच दिवशी घेतला जाणार आहे. तर सावंतवाडीतील संत गाडगेबाबा मंडईच्या नवीन संकुलाचे भूमिपूजन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.

error: Content is protected !!