खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड या तालुक्यातील कोर्ले या गावातील सुपुत्र श्री भूषण महादेव बेळणेकर यांची नुकतीच मुंबई पोलीस साहाय्यक आयुक्तपदी निवड झाली असून नुकतेच त्यांच्या नियुक्तीचे पत्र पोलीस महासंचालक श्री विश्वास नांगरे पाटील यांच्या शुभहस्ते मुंबई येथे देण्यात आले. श्री भूषण महादेव बेळणेकर हे सद्या आझाद मैदान मुंबई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक म्हणून कार्यरत होते. सन १९९१ साली महाराष्ट्र पोलीस सेवेत दाखल झालेले श्री भूषण महादेव बेळणेकर यांची महाराष्ट्र पोलीस सेवेत आजपर्यंत तब्बल ३२ वर्षे इतकी सेवा झाली असून त्यांच्या पोलीस सेवा प्रशासनातील एकूणच कामाची दखल घेऊन त्यांना नुकतीच सहाय्यक पोलीस आयुक्त पदी बढती देण्यात आली आहे.
श्री भूषण महादेव बेळणेकर यांच्या या अभिनंदनीय निवडी बद्दल त्यांचे कोर्ले गावचे सरपंच श्री विश्वनाथ खनविलकर यांनी विशेष अभिनंदन केले आहे.तर सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव केला जात असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोर्ले या गावातील ग्रामस्थांच्या वतीने तसेच त्यांच्या मित्र परिवारातर्फे त्यांचे कौतुक व अभिनंदन केले जात आहे.
Congratulations