ब्युरो न्युज (मुंबई ) : ‘महाभारत’ या लोकप्रिय मालिकेतील शकुनि मामाची भूमिका साकारणारे अभिनेता गुफी पेंटल यांचे आज सोमवारी 5 जुन रोजी निधन झाले आहे. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील अंधेरीत असलेल्या रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होता. तर त्यांचे सहकलाकारा सुरेंद्र पाल यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आज संध्याकाळी 4 वाजता त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कारार होणार आहे.गुफी पेंटर यांची तब्येत जेव्हा खालावली तेव्हा ते फरीदाबाद येथे होते. सगळ्यात आधी त्यांनी फरीदाबादच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यानंतर त्यांना मुंबईत आणलं होतं.












