संभाव्य ” बायपरजॉय” चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील तरुणांची टीम स्वयंप्रेरणेने मदतीसाठी सज्ज. – डॉ. कमलेश चव्हाण

मार्गदर्शक सूचनांसह सर्वांचे संपर्क क्रमांक सोशल मिडीयाद्वारे जनतेपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न

कुडाळ ( अमोल गोसावी ): पुढील ४८ तासांमध्ये अरबी समुद्रात तयार होणाऱ्या बायपरजॉय नावाच्या चक्रीवादळाने कोकणला प्रचंड पाऊस, पूर, वादळी वारे यांना तोंड द्यावे लागेल असा इशारा वेधशाळेने दिला आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातही शासकीय आपत्ती निवारण यंत्रणा त्यांच्या पातळीवर सज्ज झालेली असेलच पण त्या अगोदरच आपत्ती निवारणाच्या कामासाठी आणि वादळाचा तडाखा बसल्यास जनतेच्या मदतीसाठी सिंधुदुर्गातील जवळपास ३० ते ३५ युवकांची टीम स्वप्रेरणेने सज्ज झाली आहे. ज्या तत्परतेने ही युवामंडळी या वादळाला तोंड देत लोकांच्या मदतीला सज्ज झाली आहेत, ते खरोखरच वाखाणण्याजोगे आहे. डॉ. कमलेश चव्हाण , बाबल आल्मेडा आणि दामोदर तोडणकर यांच्या मार्गदर्शन आणि नेतृत्वाखाली जिल्ह्यातील ३० ते ३५ तरुणांची टीम बायपरजॉय वादळाचा तडाखा सिंधुदुर्ग जिल्ह्याला बसल्यास वादळग्रस्त नागरीकांना तातडीने मदतीसाठी धावून जाणार आहे. यातील बहुतेक जण साहसी खेळ, आपत्तीव्यवस्थापन, सापांचे जीव वाचवणे, घाटातील प्राण्यांचे रोड-किल वाचवणे, एवढेच नव्हे तर घाटात अपघात झालाच तर जीव वाचवण्यासाठी किंवा मृतदेह बाहेर काढण्यासाठी आपल्या स्वतःच्या हिंमतीवर सगळं काही करत असतात शासकीय आपत्ती व्यवस्थापन विभागापेक्षाही त्वरेने त्यांनी आपली नावे व फोन नंबर देत सावधगिरीच्या सूचनांसहचा मेसेज सर्वदूर आणि जवळजवळ प्रत्येकापर्यंत पोहोचवला आहे. डॉ कमलेश चव्हाण यात समन्वय साधून ही यंत्रणा राबवताना दिसत आहेत. भविष्यात अशी नैसर्गिक संकटांची स्थिती कायमच राहणार आहे. यासाठी प्रत्येक गावात आपत्ती व्यवस्थापनाचे परफेक्ट प्रशिक्षण घेतलेली तिथल्याच वीस युवक-युवतींची टीम ग्रामपंचायतीकडे असणे आवश्यक आहे तसेच त्यांच्याकडे गरजेची उपकरणे असायलाच हवी. आणि ही यंत्रणा उभारणे सरकार आणि प्रशासन यांना अजिबात अशक्य नाही. यासाठी इच्छुक तरुण तरुणींना प्रशिक्षण देण्याची तयारी डॉ. कमलेश चव्हाण आणि सहकाऱ्यांनी यापूर्वीच प्रशासनाला दाखवलेली आहे. त्या कामाला योग्य दिशा देण्याची हीच वेळ आहे. मार्गदर्शक सूचना करताना डॉ. कमलेश चव्हाण यांनी सांगितले आहे की, यापूर्वी झालेल्या निसर्ग वादळाप्रमाणेच काहीशी परिस्थिती येत्या एक ते दोन दिवसात कोकण किनारपट्टी वर निर्माण होणार आहे. जरी “बायपरजॉय” वादळाची अनुमानीत धडक ही कोकण किनारपट्टी पासून दूर असली तरी तिचे होणारे परिणाम व जर वादळाची दिशा बदलल्यास सतर्कता म्हणून घ्यावयाची काळजी यासाठी हा इशारा मेसेज पाठवत आहोत. गतवर्षीप्रमाणेच या वादळातही प्रामुख्याने सर्व माणसे सुरक्षित रहावीत आणि कोणतेही आर्थिक नुकसान होणार नाही यासाठी आपण सर्वांनी काळजी घ्यावी. माणसाचा जीव वाचणे गरजेचे आहेच, पण सर्वांच्या योगदानातून किनारपट्टी जवळील गावात तसेच समुद्रकिनारी एखादा वन्यजीव, प्राणी, पक्षी, व्हेल व डॉल्फिन सारखे मोठे मासे, समुद्री कासवेही वाचवली गेली पाहिजेत. या रेस्क्यू वेळी नागरिकांना कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास त्यासाठी समन्वय साधण्याचे काम टीम करेल. वादळात सुमारे १०० कि. मी. पेक्षा जास्त वेगाने वारे वहाण्याची शक्यता असते. किनारपट्टी जवळील गावात तसेच समुद्र किनारीनजीक मुसळधार पावसामुळे घरांमध्ये पाणी घुसणे, दरडी वा झाडे कोसळणे वगैरे मोठ्याप्रमाणात होण्याची शक्यता आहे. आपले घर त्यादृष्टीने सुरक्षित असल्याची खात्री करून घ्या व तशी खात्री असल्यास घराच्या बाहेर पडू नका. अन्यथा सुरक्षित स्थळ उंचावर निवडून आवश्यक ती साधनसामुग्री सोबत घेवुन तेथे स्थलांतरीत व्हा. तत्पुर्वी घरातील किमती वस्तूची व्यवस्था लावा, विद्युत उपकरणे वसुरक्षित करा, लाईटचा मेन स्वीच बंद करा, किटकनाशके, रासायनिक औषधे खते वगैरे असतील तर ती पाण्यात मिसळणार नाहीत याची दक्षता घेत ती सुरक्षित ठेवा. पाळीव प्राणी यांना अगोदरच सुरक्षित स्थळी हलवा. सोबत आवश्यक आणि पुरेसे अन्न, पिण्याचे पाणी, कपडे, औषधे जवळ ठेवावे. बॅटरी, अतिरिक्त बॅटरी वा सेलचा सेट, गॅसबत्ती, काडीपेटी, लायटर, सुके खाद्यपदार्थ जवळ बाळगा. विजेचे खांब कोसळणे, तारा तुटणे हे प्रकार होतील. त्यामुळे कम्युनिकेशनची सर्व उपकरणे निकामी ठरण्याची शक्यता असल्याने जवळ रेडिओ ठेवा. जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार सुरक्षित उपाययोजना कराव्यात. वन्यप्राणी घरात आल्यास स्थानिक सर्पमित्र आणि प्राणिमित्रांची मदत घ्या. कोवीड -19 ने सिध्द केले आहे की कोणत्याही आपत्कालीन स्थितीत माणुसकी एवढे मोठे शस्त्र नाही. त्याच नात्याने आम्ही सज्ज आहोत. कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास संपर्क करावा. असे आवाहन डॉ. कमलेश चव्हाण यांनी केले आहे.
अशा महत्वपूर्ण मार्गदर्शक सुचना करताच आपत्ती व्यवस्थापनसाठी स्वयंप्रेरणेने सज्ज असतेल्या जिल्ह्यातील सेवाभावी कार्यकर्त्यांचे संपर्क क्रमांकही खाली देण्यात आले आहेत
🤚डॉ. कमलेश चव्हाण
9420207055 / 8806465088
🤚बाबल अल्मेडा सर
9422061230 / 9130529506
🤚दामोदर तोडणकर
9420299910 / 9404742843
.किनारपट्टी/ घाटमार्ग निहाय संपर्कासाठी*

मालवण
वैभव खोबरेकर
9421572514 / 9168573876
अन्वय प्रभू
7820822388
सचिन गोवेकर
9422077772
जगदीश तोडणकर
9960036393 / 942238175
.
वेंगुर्ला
अजय सारंग
9405241316 / 9420150436
सुहास तोरसकर
9403072991
श्रीधर मेथर
94208 21991
.
आचरा
दीपक कुबल
9421438162 / 9405082136
.
देवगड
अण्णा खवळे
8007449869 / 9403302919
.
विजयदुर्ग
सरदार जानराव धुळप
9022542994
.
सावंतवाडी तथा आंबोली घाट
मायकल डिसोझा
9423887119 / 8411927119
दीपक मेस्त्री
9764206760
प्रतीक मोहिते
788 8213629 / 7588343568
.
वैभववाडी गगनबावडा घाट
प्रो. सुरेश पाटील सर
9423300321 / 9834984411
संतोष टक्के
9423300274
.
फोंडा घाट
गणेश जेठे
9423041421 / 9421266727
महेश सावंत
8698981919 / 9370268153
.
राधानगरी
सम्राट केरकर
9421174337 / 9604113743
.
सर्पमित्र तथा प्राणीमित्र
स्वरूप वाळके, कुडाळ
8788278409 / 8888777266
डॉ. प्रसाद धूमक, कुडाळ
9422436244 / 95454 36244
ओमकार लाड, मालवण
9405099530 / 8208217467
आनंद बांबर्डेकर, मालवण
7588924701
नंदू कुपकर, मालवण
9420305037
कृष्णा कदम, कुडाळ
9823473807
सिद्धेश ठाकूर, कुडाळ
9420302730
विष्णु मसके, कुडाळ
8087826148
डॉ. श्रीवादन आरोसकर, सावंतवाडी
9421123500 / 9923420500

error: Content is protected !!