सिंधुदुर्ग – रत्नागिरीतील टॉवर्सची यंत्रसामग्री नवीन बसवा

खासदार विनायक राऊत यांची टेलिकॉम सर्कलचे सीजीएम रोहित शर्मा यांच्याकडे मागणी

कुडाळ (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील बीएसएनएल टॉवर्सना आवश्यक असलेल्या बॅटरींची आणि इतर इक्विपमेंटची जोड मिळावी तसेच सातत्याने बंद पडणाऱ्या टॉवर्सची यंत्रसामग्री नवीन बसवावी अशी मागणी शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी महाराष्ट्र टेलिकॉम सर्कलचे सीजीएम रोहित शर्मा यांची मुंबईत प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली. यावेळी झालेल्या चर्चेत शर्मा यांनी याप्रश्नी वेळीच कार्यवाही केली जाईल अशी ग्वाही दिली. कोकणवासीयांना मोबाईल कनेक्टीविटीमध्ये अडथळा निर्माण होणार नाही आणि नवीन मंजूर झालेल्या 4G टॉवर्सचे काम लवकरात लवकर सुरू करावे, याकडे शर्मा यांचे लक्ष वेधले. रोहित शर्मा यांनी आवश्यक असलेल्या सर्व उपकरणांची लवकरात लवकर पूर्तता करण्यात येईल, तसेच वारंवार बंद पडणाऱ्या टॉवर संबंधित तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती खासदार राऊत यांच्या सिंधुदुर्ग संपर्क कार्यालयाकडून देण्यात आली.

error: Content is protected !!