धमक्या देऊन कुणी आवाज बंद करु शकत नाही – शरद पवार

राज्य सरकारकडून गंभीर दखल

ब्युरो न्युज (मुंबई) : तुझा लवकरच दाभोळकर होणार” अशी धमकी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना ट्वीटरवर देण्यात आली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. कायदा सुवस्थेवर मला विश्वास आहे, त्यामुळे याची मला चिंता नाही, असे शरद पवार म्हणाले. कोणत्याही प्रश्नावर मत देण्याचा अधिकार या जनतेच्या प्रत्येक नागरिकाला आहे आणि असं असताना धमक्या देऊन कुणाचा आवाज बंद कराल असे वाटत असेल तर हा गैरसमज आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी दिली आहे. महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेवर माझा पूर्णपणे विश्वास आहे, त्यामुळे मला चिंता नाही. पण ज्यांच्या हातात राज्यातील सुत्रे आहेत.. त्यांना जबाबदारी टाळता येत नाही, असे शरद पवार म्हणाले. धमकीची मला कोणतीही चिंता नाही. कायदा आणि व्यवस्थेची जबाबदारी ज्यांना देण्यात आली आहे, ज्यांच्यावर आहे, त्यांना आपली जबाबदारी टाळता येणार नाही, असे शरद पवार नाही.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांना ट्विटरवरुन आलेल्या धमकीची सरकारने गंभीर दखल घेतली असून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी मी स्वतः बोललो आहे, तपासाच्या सूचना दिल्या आहेत, असे ट्वीट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेय. शरद पवार हे ज्येष्ठ नेते असून, त्यांच्याबदल आम्हा सर्वांनाच आदर आहे. त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण काळजी घेतली जाईल. आवश्यकता असल्यास सुरक्षा व्यवस्थेत वाढही करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत, असेही शिंदे म्हणाले.

error: Content is protected !!