दहावीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते सन्मान

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करत दिल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील नाथ पै नगर, जळकेवाडी, परबवाडी येतील दहावीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केला सत्कार व पुढील वाटचालीस दिल्या शुभेच्छा. S.S.C परीक्षेत उत्तम गुण आत्मसात केलेल्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याचे काम युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केले. यात कु.श्रुष्टि संतोष जोगळे. 96.40% – नाथ पै नगर, कु.पारस अनिल परब. 97% – नाथ पै नगर, कु. आयुष चेतन मालपेकर. 97.40% – जळकेवाडी या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला. यावेळी योगेश मुंज, जोगळे, परब, व मालपेकर परिवार उपस्थित होता.

error: Content is protected !!