कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांच्यासह कलमठवासीय आक्रमक
कणकवली (प्रतिनिधी): कलमठ गावातील वीज समस्येबद्दल ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे ,कमी दाबाचा पुरवठा ,नादुरुस्त वीज खांब , अपुरे कर्मचारी , अधिकरी नॉट रिचेबल अश्या अनेक तक्रार देऊन देखील कोणतीच कारवाई होत नसल्याने किंवा विद्युत पुरवठा सुरळीत होत नसल्याने आता ग्रामस्थांनी थेट विज कार्यालयाला टाळे ठोकले आहे यावेळी सरपंच संदीप मेस्त्री ,महेश लाड ,पपू यादव ,नितीन पवार ,दिनेश गोठणकर ,श्रेयस चिंदरकर ,आबा कोरगावकर ,बाबू नारकर ,मिलिंद चिंदरकर ,तेजस लोकरे ,वैभव चिंदरकर , निखिल कुडाळकर ,सत्येंद्र जाधव ,सचिन वाघेश्री ,प्रसाद काकडे , आबा कोरगावकर ,रोहित चिंदरकर ,नाना गोठणकर ,विजू धुत्रे ,बंडू दंताळ , उपस्थित होते













