जर ही पात्रता तीन महिने चालते मग नियमित का नाही संघटनेचा सवाल
कुडाळ (अमोल गोसावी) : १५ जुनपासून जि. प. च्या प्राथमिक शाळा सुरु होत आहेत मात्र तब्बल १२१ शाळात शून्य शिक्षक आहेत. आपल्या जिल्ह्याचे आमदार हे शिक्षणमंत्री आहेत त्यांनी या ठिकाणी डीएड बेरोजगारांना स्वयंसेवक म्हणून नव्हे तर कायमस्वरूपी सेवेत घ्यावे. जर पडत्या काळात डीएड पदवीका चालत असेल तर कायमस्वरूपी का नको असा सवाल डीएड बेरोजगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय फाले यांनी केला आहे. तसेच शिक्षण विभाग आता स्वयंसेवक नेमत असून अवघे दोन दिवस शाळा सुरु व्हायला असून शिक्षण विभागावर तीव्र नाराजी आहे.
यावेळी श्री. फाले माध्यमाशी बोलताना म्हणाले येत्या 15 तारीखला सिंधुदुर्गातील जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू होणार असून गंभीर बाब तब्बल १२१ शाळा शिक्षकाविना आहेत या शाळांत तात्पुरत्या स्वयंसेवक ५००० मानधन तत्वावर स्थानिक डीएड पदवीधर याची नेमणूक करून १२१ शाळा उघडण्याचा जो घाट जिल्हा शिक्षण विभागाने घातला आहे तो सिंधुदुर्ग डीएड बेरोजगार संघर्ष समितीचे पदाधिकारी यशस्वी होऊ देणार नाही.जोपर्यंत जिल्ह्यातील बेरोजगार डीएड पदवीधारकांच्या रीतसर नियुक्त्या होत नाही तोपर्यंत या जिल्हा शिक्षण विभागाच्या या धोरणाला प्रखर पणे विरोध राहील.आज परजिल्ह्यातील शिक्षक बदली करून गेल्यामुळे जिल्ह्यांत अनेक शाळातील पदे रिक्त झाली आहेत आणि ही पदे भरण्याच्या कोणत्याही हालचाली सद्यस्थितीत नाही.15 जून ला शाळा उघडल्या तर अध्यापन करण्यासाठी शिक्षक नाही आणि रिक्त पदे झाल्यामुळे उद्या शाळा उघडणार कोण ? शालेय पोषण आहार, शाळा दुरुस्ती याकडे लक्ष देणार कोण हा प्रश्न निर्माण झाला आहे.तसेच विदयार्थी शैक्षणिक नुकसान देखील होणार आहे . जिल्हयात 121 शाळा हया शून्य शिक्षकी आहेत त्यावर तात्पुरता शिक्षक देऊन तीन महिने घालवण्याचा घाट आहे.त्यासाठी जिल्हा परिषद आणि लोक प्रतिनिधी यांची धडपड चालु आहे.जिल्ह्यांत ११४० शिक्षकांची रिक्त पदे आहेत. सर्वच रिक्त पदे स्थानिकांमधुन भरावित आणि जिल्ह्यातील शैक्षणीक नुकसान टाळावे असे कोणालाच वाटत नाही.स्थानिक भरती करुन रिक्त पदे भरली तर जे बेरोजगार आहेत त्यांना न्याय मिळेल.त्यामुळे रिक्त जागा भरण्यासाठी प्रयत्न व्हावे तात्पुरती मलम पट्टी करण्यासाठी करु नये. आज जिल्हा परिषद स्व निधीतून 5000 मानधनावर स्वयंसेवक म्हणुन तात्पुरत्या स्वरूपावर तीन महिन्यासाठी रुजू करून जिल्ह्यातील डी.एड धारकांची चेष्टा केली जात आहे ती त्वरीत थांबवली पाहिजे ..नियुक्त्या देणार असतिल तर कायमस्वरूपी स्थानिकांनl द्याव्यात.तीन महिन्यांसाठी हा खेळ नको.तीन महिन्यांनी परत इथल्या उमेदवारांना डावलून परजिल्ह्यातील लोकांना संधी मिळणार आहे हे शाश्वत सत्य आहे आणि हे होऊ नये .. जॉब देत आहात म्हणुन बेरोजगार हुरळून जाणार नाहीं. देणार असाल तर कायमस्वरुपी नियुक्ती द्या .
सद्यस्थितीत सिंधुदुर्गात ८०२ उपशिक्षक, ३१६ पदवीधर शिक्षक आहेत व आंतर जिल्हा बदलतून ४५१ शिक्षकांना कार्यमुक्त केले आहेत व अद्याप ११ शिक्षक जिल्ह्यात आलेले आहेत, अशी एकूण १११८ रिक्त पदे आहेत. त्यामूळे पवित्र पोर्टलनुसार भरती झाली तर आपल्या जिल्ह्यातील १०% पण उमेदवार लागणार नाही ही बाब पाहता पवित्र पोर्टल हे सिंधुदुर्ग डी.एड बेरोजगारांवर अन्यायकारक ठरणार आहे.
परजिल्ह्यातील उमेदवार तीन वर्ष नोकरीसाठी सिंधुदुर्ग मध्ये येतात आणि परत बदली करून आपल्या जिल्ह्यात जातात त्यामुळे शाळा पुन्हा शिक्षकाविना रिक्त राहतात. जर तिथे भरती प्रक्रियेतून स्थानिक शिक्षकांना नियुक्त्या मिळाल्या तर वारंवार होणारी आंदोलने आणि स्थानिक भूमिपुत्र यांच्यावर होणारा अन्याय आणि बदली प्रक्रियेचा प्रश्न मिटून जाईल. महाराष्ट्र राज्यातील शिक्षक भरती होत असताना प्रत्येक जिल्हास्तरावर स्थानिकांना ८०% जागांवर प्राधान्य देऊन उरलेल्या २०% जागांवर इतर जिल्ह्यांतील उमेदवारांना संधी द्यावी.
या अगोदर अशा भरती प्रक्रिया झालेल्या आहेत त्यामुळे स्थानिक प्राधान्य देऊन पूर्वी प्रमाणे सेवायोजन कार्यालयामार्फत, जिल्हा निवड समिती मार्फत किंवा रद्द झालेले कोकण निवड मंडळ पुन्हा निर्माण करून स्थानिक पातळीवर डी.एड च्या मेरीटप्रमाणे स्थानिकानमधूनच सरसकट शिक्षक भरती करावी. सिंधुदुर्ग व रत्नागिरी या दुर्गम डोंगराळ भागाचे निकष, बोलीभाषेचे निकष ओळखून भरती केल्यास विद्यार्थी स्थानिक बोलीभाषा आणि प्रमाण भाषेची असलेली जोड लक्षात घेता विद्यार्थ्याला मिळणारे शिक्षण त्यामुळेच सहाजिकच गुणवत्तेत सकारात्मक परिणाम होऊन नक्कीच गुणवत्ता संवर्धन होईल.
सदर सभा ही तात्पुरत्या स्वरूपात मानंधन तत्वावर स्वयंसेवक नेमणुक देऊन तीन महिन्यासाठी जो काय जि. प मधून घाट घातला आहे त्याला तीव्र विरोध म्हणुन ठेवण्यात आली होती..जिल्ह्यातील स्थानिकांचा वापर करण्याचा डाव साधला जात आहे..ही सभा सावंतवाडीतील माजगाव भटवाडी येथील पोपकर हॉल मधे झाली. सभेला शेकडो डी एड बेरोजगार उपस्थित होते.त्यात डी एड बेरोजगार संघर्ष समिती अध्यक्ष विजय फाले, उपाध्यक्षा स्वराली वाक्कर, गौरी आडेलकर.प्रमोद डीचोलकर, विलास जंगले, प्रशांत गावकर, दिनेश नाईक, रुबी राणे, नेत्रा सांडव,कविता दळवी, प्रीती चव्हाण, समीर गोसावी असे अनेक डी.एड धारक उपस्थित होते.महत्वाचं म्हणजे सभेला












