मालवण (प्रतिनिधी): चिंदर गावठणवाडी येथील जेष्ठ व्यक्तीमत्व तसेच बारा-पाच मानकरी शांताराम तावडे-मतकरी यांचे काल रात्री मुंबई येथे वृध्दापकाळाने निधन झाले. ते 85 वर्षाचे होते. ते शांताराम मामा या नावाने सुपरिचित होते. मुंबई पोलिस दलातही त्यांनी काही काळ सेवा बजावली होती. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, नातवंडे, असा मोठा परिवार आहे. मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेले प्रमोद तावडे यांचे ते वडील होत.