वैभववाडी उ.बा.ठा.च्या वतीने मुख्याधिकारी वाभवे वैभववाडी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
वैभववाडी (प्रतिनिधी): आपण शहरातील जे गोरगरीब स्टॉलधारक जे आपली रोजीरोटी चालविणेसाठी छोटेमोटे व्यवसाय करीत होते; त्यांना हटवून त्यांच्यावर आपण उपासमारीची वेळ आणलीत. त्यापूर्वी आपण त्या सर्व स्टॉलधारकांना आपण आश्वसन दिलेले होते की, येत्या मे २०२३ मध्ये व पावसाळ्यापूर्वी आम्ही तुम्हाला पर्यायी जागा उपलब्ध करून देऊ असे सांगितलेले होते. परंतु अद्यापही आपण त्या बेरोजगार स्टॉलवाल्यांच्या पूर्नवसनासाठी कोणतेही सकारात्मक पाऊल उचललेले नाही. हे सर्व स्टॉलधारक आपल्या तालुक्यातील व शहरातील नागरीक आहेत. गेले सहा महिणे त्यांना रोजगार नसल्याने व त्यांचे व्यवसाय बंद झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची पाळी आलेली आहे. मात्र आपण नगरपंचायत प्रशासन कुणाच्यातरी दबावाखातर त्या स्टॉलधारकांचे मानसिक व आर्थिक शोषण करण्याचा प्रयत्न करीत आहात. तरी आपण शासनाकडून त्यांना तात्काळ पर्यायी जागा उपलब्ध करून देऊन त्यांच्या स्टॉलचे पुर्नवसन करावे. जर आपणाकडून त्यांचे योग्य पुर्नवसन होत नसेल तर त्यांना पावसाळ संपेपर्यंत त्यांचे स्टॉल ज्या ठिकाणी होते त्याठिकाणी त्यांना व्यवसाय करणेस तात्पुरती परवानगी द्यावी; जेणेकरून त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार नाही याची काळजी घ्यावी या आशयाचे निवेदन वैभववाडी शिवसेना उ.बा.ठा. च्या वतीने देण्यात आले.












