आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

राष्ट्रवादी चषक २०२४ क्रिक्रेट स्पर्धेचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या हस्ते झाले उदघाटन

तुळस जकात नाका येथे आयोजित करण्यात आलीय क्रिक्रेट स्पर्धा वेंगुर्ला (प्रतिनिधी) : वेंगुर्ला तालुक्यातील तुळस जकात नाका येथे  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी  तालुका अध्यक्ष संदिप पेडणेकर यांच्या संकल्पनेतून आयोजीत  राष्ट्रवादी चषक २०२४ चे उद्घाटन जिल्हा अध्यक्ष अबिद नाईक यांच्या हस्ते करण्यात…

उर्वरित आयुष्यात, दरवर्षी विश्वास- आनंद आणि ऊर्जा शोधणारा, फोंडाघाटचा ” बचपन के दोस्त ” ग्रुप.

६५ वर्षावरील मित्र-मैत्रिणींच्या खट्याळ ग्रुपचा स्नेहोत्सव उत्साहात संपन्न ! फोंडा हायस्कूलच्या १९७४ – ७५ वर्षीच्या वर्गातील मित्र- मैत्रिणींचा आनंदोत्सव ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : वृद्धत्व आणि बालपण सारखंच असतं ? असं सर्वजण म्हणतात.मात्र त्याचा प्रत्यय नुकताच फोंडाघाटच्या पूर्णानंद भवन मध्ये अनुभवास…

लोकसभेला सिंधुदुर्गात ६ लाख ५७ हजार ७८० मतदार

जिल्हा यंत्रणा निवडणूकीसाठी सज्ज – जिल्हाधिकारी किशोर तावडे सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : भारत निवडणूक आयोगाने देशाच्या लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक जाहीर केली असून राज्यातील तिसऱ्या टप्प्यात रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या निवडणूक यंत्रणेची पूर्वतयारी पूर्ण…

बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी नेस्टर घोंसालवीसचा जामीन नामंजूर

अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांचा यशस्वी युक्तिवाद सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : पीडित युवतीवर बळजबरीने शारीरिक अत्याचार केल्याच्या गुन्ह्यातील आरोपी नेस्टर आग्नेल घोंसालवीस ( वय 29, रा. सांगवे, ता कणकवली ) याचा जामीन अर्ज विशेष जिल्हा न्यायाधीश हेमंत गायकवाड यांनी फेटाळला.…

ओसरगाव मध्ये कार भरधाव पलटी ; प्रवासी जखमी

कणकवली (प्रतिनिधी) : गोवा ते सातारा जाणाऱ्या कारला मुंबई गोवा महामार्गावरील ओसरगाव गवळीवाडी येथे चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. यात कारमधील पर्यटकांना किरकोळ दुखापती झाली असून गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली. सातारा…

किल्ले विजयदुर्गच्या डागडुजीसाठी स्थानिक विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीने सहकार्य करावे – जान्हवीज शर्मा

विजयदुर्ग (प्रतिनिधी) : किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे कार्य खरोखरच कौतुकास्पद असून पुरातत्व विभागाच्या वतीने या किल्ल्याच्या डागडुजीसाठी किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीने सहकार्य करावे अशी अपेक्षा भारतीय पुरातत्व विभागाचे केंद्रीय अतिरिक्त महासंचालक जान्हवीज शर्मा यांनी आज विजयदुर्ग येथे व्यक्त केली. शर्मा…

शिवसेना नेते अतुल रावराणे यांच्या कणकवलीतील श्री भैरी गणेश संकुलाचा शानदार शुभारंभ

आमदार वैभव नाईक, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे बंधू संकेत चव्हाण,सतीश सावंत, संदेश पारकर, सुशांत नाईक यांची होती प्रमुख उपस्थिती राजकारणापालिकडील अतुल रावराणे – रवींद्र चव्हाण यांच्या मैत्रीचा पुनरप्रत्यय कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात बांधकाम…

कणकवलीत पोलिसांचे संचलन

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा अलर्ट कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या सुचनेनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी, कणकवली विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने कणकवली पोलीस ठाणे हद्दीत बाजारपेठ, एसटी स्टॅण्ड, पटवर्धन चौक, इत्यादी गर्दीच्या…

निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद ; लोकसभा निवडणूक झाली जाहीर.

रत्नागिरी – सिंधुदुर्ग ७ मे रोजी मतदान महाराष्ट्रात ५ टप्प्यात होणार मतदान ४ जूनला लागणार निकाल मुंबई (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आजपासून आचारसंहिता जाहीर करण्यात आली. आता ४ जूनला मतमोजणी होणार असून त्यादिवशी नवीन सरकार बसणार आहे. दरम्यान…

बेकायदेशीररित्या सुरु असलेली व्हिडीओ खेळगृहे आढळल्यास करमणूक कर कार्यालयाशी संपर्क साधा – सैपन नदाफ

शिरोळ येथील दोन व्हिडीओ खेळगृहे सील कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर,जिल्ह्यामध्ये करमणूक कर कार्यालयाकडून देण्यात आलेले व्हिडीओ खेळगृहाचे परवाने त्यांना मंजूर करण्यात आलेल्या पत्त्यावर असणे आवश्यक असून या कार्यालयाची कोणतीही परवानगी न घेता अन्य ठिकाणी स्थलांतरीत केले असल्यास अथवा अटी व…

error: Content is protected !!