आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

ठाकरे गटाच्या पाळेकरवाडी उपसरपंच सायरा मुल्ला भाजपात

आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत केला पक्षप्रवेश देवगड (प्रतिनिधी) : तालुक्यातील पाळेकर वाडी येथील ग्रामपंचायत मध्ये अडीच वर्षांनी सत्तांतर झाले असून उबाठा सेनेच्या देवगड मालभाटी येथील माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य श्रीमती सायरा मुल्ला यांनी आमदार नितेश राणे यांच्या हस्ते भाजपामध्ये…

डिजीटल पेमेंटबाबत जागृकता सप्ताहाच्या निमित्ताने सावंतवाडीत जागृकता प्रशिक्षण वर्गाचे आयोजन

सावंतवाडी (प्रतिनिधी) : भारतीय रिजर्व बँक ऑफ इंडीयाच्या भूगतान और निपटान प्रणाली विभाग मुंबई क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने व सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सह. बँक लि., सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने दि. ७ मार्च रोजी डिजीटल पेमेंटबाबत जागृकता सप्ताहाच्या निमित्ताने विविध डिजिटल पेमेंट माध्यमांबाबत…

भरधाव वेगातील चिरे वाहतूक ट्रकची दोन दुचाकींना धडक

एकजण जखमी : धामापूर येथील घटना ; पळून जाणारा ट्रक काळसे येथे पकडला चौके (अमोल गोसावी) : भरधाव वेगाने चिरे वाहतूक करणाऱ्या ट्रकने धामापूर येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन दुचाकींना धडक दिल्याची घटना आज गुरुवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास…

शेतकऱ्यांनी पिकांच्या नुकसान भरपाईसाठी संघटित लढा देने आवश्यक; यासाठी श्री रवळनाथ मंदिर ओरोस येथे बैठकीचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी तसेच विविध पिकांच्या नुकसानीची नुकसान भरपाई मिळावी. यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी संघटित होऊन लढा देने वश्यक आहे. त्यासाठी रविवार १० मार्च २०२४ रोजी श्री रवळनाथ मंदिर ओरोस येथे सकाळी १० वाजता बैठकीचे आयोजन करण्यात…

जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

विविध मागण्यांसाठी छेडले आंदोलन सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खावटी कर्जमाफीचा लाभ मिळावा ,सन २०१७ च्या यादितील शेतकऱ्यांना सन्मान योजनेचा लाभ मिळावा. थ्रिप्स रोगामुळे व कोळे रोगामुळे झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई मिळावी. या मागणीकड़े आज जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालया…

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत सिंधुदुर्ग जिल्हा काेकण विभागात आघाडीवर

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची कार्ड काढण्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याने कोकण विभागासह राज्यात आघाडी कायम राखली असून आतापर्यन्त ६१ टक्के काम पूर्ण केले आहे. जिल्ह्यातील एकूण ६ लाख ६२ हजार ०९४ पात्र लाभार्थी पैकी आतापर्यंत ४ लाख…

फोंडाघाटात कंटेनर उलटला; वाहतूक खंडित

फोंडाघाट (प्रतिनिधी) : मध्यप्रदेश वरून गोव्याच्या दिशेने केबल ची वाहतूक करणारा कंटेनर MH ४६ BF 3803 चालक ओमप्रकाश जगमोहन बर्मा वय ४५ राहणार उत्तर प्रदेश प्रतापगढ हा गोव्याच्या दिशेने केबल ची वाहतूक करत असता फोंडाघाट मधील अवघड वळणावर सकाळी १०:३०…

टिल्ल्या आमदार वैभववाडी तालुका विकासातील अडसर ; शिवसेना नेते अतुल रावराणे यांची नितेश राणेंवर कडवट टिका

पंचायत समिती नूतन इमारतीचे उद्याचे लोकार्पण रद्द; अतुल रावराणे यांनी घेतला समाचार वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्या 8 मार्च रोजी होणार होते मात्र टिल्ल्या आमदार नितेश राणे यांच्यामुळे पुन्हा एकदा…

माधवराव पवार विद्यालय कोकिसरेचे शिक्षक स्वप्निल पाटील ‘राज्यस्तरीय उत्कृष्ट विज्ञान’ पुरस्काराने सन्मानित

तळेरे (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील श्री माधवराव पवार विद्यालय कोकिसरे या प्रशालेत विज्ञान शिक्षक म्हणून कार्यरत असणारे स्वप्निल श्रीकांत पाटील यांना अविष्कार फाउंडेशन इंडिया तर्फे राज्यस्तरीय उत्कृष्ट विज्ञान शिक्षक गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संपूर्ण देशभरात 28 फेब्रुवारी हा दिवस…

राठीवडे नंबर 1 शाळेत रंगला महिला मेळावा व होम मिनिस्टर चा सोहळा…!

आचरा (प्रतिनिधी) : जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा राठिवडे नंबर.१ या शाळेत शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने  राठीवडे गावातील महिलांच्या सन्मानार्थ शाळेत महिला मेळाव्याचे आयोजन केले होते. महिला मेळाव्याचे उद्घाटन राठिवडे सरपंच दिव्या धुरी तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सुभाष धुरी व शाळा…

error: Content is protected !!