फोंडाघाट (प्रतिनिधी) : मध्यप्रदेश वरून गोव्याच्या दिशेने केबल ची वाहतूक करणारा कंटेनर MH ४६ BF 3803 चालक ओमप्रकाश जगमोहन बर्मा वय ४५ राहणार उत्तर प्रदेश प्रतापगढ हा गोव्याच्या दिशेने केबल ची वाहतूक करत असता फोंडाघाट मधील अवघड वळणावर सकाळी १०:३० च्या दरम्याने रस्त्याच्या मधोमध पलटी झाला त्यामुळे महामार्गावर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या सदैवणे कंटेनर चालकाला कोणतीही दुखापत झाली नाही सदर घटना समजताच फोंडाघाट चेक पोस्ट वर असणारे पोलीस कॉन्स्टेबल मारुती बारड यांनी घटनास्थळी जाऊन वाहतूक सुरळीत केली यावेळी हवालदार राजेश ठाकूर हवालदार नितीन चोडणकर पोलीस कॉन्स्टेबल महादेव साबळे, हवालदार उत्तम वंजारे उपस्थित होते.