पंचायत समिती नूतन इमारतीचे उद्याचे लोकार्पण रद्द; अतुल रावराणे यांनी घेतला समाचार
वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्या 8 मार्च रोजी होणार होते मात्र टिल्ल्या आमदार नितेश राणे यांच्यामुळे पुन्हा एकदा पुढे ढकलले आहे. टिल्ल्या आमदार नितेश राणे हा वैभववाडीच्या पुढच्या विकासातील अडसर आहे अशी टीका शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी केली. वैभववाडी रेस्ट हाऊस येथे आयोजित पत्रकार परिषदेत अतुल राणे यांनी सांगितले की, आम्ही वारंवार पाठपुरावा केला त्यानंतर पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्या वैभववाडी पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे लोकार्पण होणार होते मात्र, टिल्ल्या आमदार नितेश राणे यांच्या दुराग्रहामुळे हे उदघाटन पुन्हा एकदा पुढे ढकलले आहे. पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत मात्र तरीही अद्याप त्यांना कणकवली, देवगड आणि वैभववाडी हा मतदार संघ त्यांच्या अधिपत्याखाली नाही आहे का? असा रोकडा सवालही अतुल रावांनी यांनी केला.
एकीकडे विकास कामांचे भूमिपूजन करत असताना ठेकेदारांकडून टक्केवारी घेतल्याशिवाय आमदार नितेश राणे ठेकेदाराला सोडत नाहीत. पंचायत समितीच्या नूतन इमारतीमध्ये फर्निचर किंवा तत्सम साहित्य खरेदीचे टेंडर लावून त्यातूनही कमिशन मिळवण्याचा आमदार नितेश राणे त्यांचा प्रयत्न असल्याचा आरोपही अतुल रावणे यांनी केला. यावेळी खासदार विनायक राऊत, विधानसभा प्रमुख सतीश सावंत, तालुकाप्रमुख मंगेश लोके यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.