आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत केला पक्षप्रवेश
देवगड (प्रतिनिधी) : तालुक्यातील पाळेकर वाडी येथील ग्रामपंचायत मध्ये अडीच वर्षांनी सत्तांतर झाले असून उबाठा सेनेच्या देवगड मालभाटी येथील माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य श्रीमती सायरा मुल्ला यांनी आमदार नितेश राणे यांच्या हस्ते भाजपामध्ये भाजपामध्ये आले आहेत यापूर्वीच या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी. उदय पाळेकर हे बहुमताने निवडून आले होते यावेळी सायरा मुल्ला यांनी त्यांना मतदान केले होते.
मात्र आज भाजपामध्ये त्यांनी अधिकृत प्रवेश घेतला आहे आमदार नितेश राणे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून विकासासाठी आपण हा प्रवेश केल्याचे त्यांनी म्हटले आहे
पाळेकर वाडी ग्रामपंचायत भाजपाच्या झेंड्याखाली आल्याने ग्रामपंचायत मधील उबाठा गटाची उरली सुरली सत्ताही समाप्त झाली आहे.त्यांच्या समवेत अकबर हारून मुल्ला, शायरा अकबर मुल्ला, जुबेद अकबर मुल्ला, शायरा अकबर मुल्ला, अफ्रीन जुबार मुल्ला, मसीरा शोएब मुल्ला, मुराद जाफर मुल्ला, खातून मुराद मुल्ला, रफिक मुराद मुल्ला, फइम मुराद मुल्ला, नईम मुराद मुल्ला, जरीना रफिक मुल्ला, नुरजहा फयीम मुल्ला, अफ्रीम नईम मुल्ला, साबिरा गफार मुल्ला, आशिया गफार मुल्ला, अनिस गफार मुल्ला, मुमताज रशीद शेख, नजमा मुल्ला, शबनम अश्रफ ठाकूर ,रुबिया जाफर मुल्ला, व शेकडो नागरिकांनी प्रवेश केला आहे












