सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी तसेच विविध पिकांच्या नुकसानीची नुकसान भरपाई मिळावी. यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी संघटित होऊन लढा देने वश्यक आहे. त्यासाठी रविवार १० मार्च २०२४ रोजी श्री रवळनाथ मंदिर ओरोस येथे सकाळी १० वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन जिल्हा शेतकरी संघटक श्यामसुंदर राय यांनी केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्या आणि नुकसान भरपाई तसेच कर्जमाफी या मागण्यांसाठी गेली १० वर्षे काही ठराविक शेतकऱ्यांच्या माध्यमातून आंदोलने, उपोषण करून लढा दिला जात आहे. मात्र शासनाकडून अद्याप त्याची दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे आता जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी संघटित होऊन आपल्या मागण्यांसाठी लढा देणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अधिकृत संघटना असणे गरजेचे आहे. तरी जिल्हास्तरीय शेतकरी संघटना स्थापन करण्यासाठी रविवार १० मार्च २०२४ रोजी सकाळी १० वाजता श्री रवळनाथ मंदिर ओरोस येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन शेतकरी संघटना संघटक शामसुंदर राय यांनी केले आहे.












