राष्ट्रीय खुल्या ज्यूदो स्पर्धेत श्रद्धा चोपडेने सुवर्ण तर आकांक्षा शिंदे व अपूर्वा पाटील कांस्यपदकाची मानकरी

विकास देसाई आणि समीक्षा शेलार पाचव्या आणि सातव्या स्थानावर तळेरे (प्रतिनिधी): 01 ते 04 ऑक्टोबर दरम्यान जयपूर येथे आयोजित खुल्या राष्ट्रीय ज्युदो स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या श्रद्धा चोपडेने तब्बल 25 वर्षांच्या कालावधीनंतर राज्याला सुवर्णपदक मिळवून दिले. 52 किलोखालील गटात मिळवलेले है…







