रानडुक्कर सांगून पाळीव डुक्कराची मटण विक्रीचा सूत्रधार राधानगरीत

वरवडे -फणसवाडीत फसवणूक करणाऱ्या विक्रेत्याला दिला चोप

सुत्रधाराचे फोंडाघाट तरंदळे येथे मुख्य एजंट

कणकवली (प्रतिनिधी): रानडुक्करचे मटण असल्याचे सांगून चक्क पाळीव डुक्कराचे मटण 500 रु किलो दराने विक्री करणारे रॅकेट असून त्याचा सूत्रधार राधानगरी येथील आहे. या सुत्रधाराचे मुख्य एजंट फोंडाघाट आणि तरंदळे गावातील असल्याची माहिती उघड झाली आहे. आज अशाच प्रकारे फसवणूक करून डुक्कराचे मटण विकण्याचा प्रकार वरवडे फणसवाडीत जागरूक नागरिकांनी उघडकीस आणला. किलोमागे 50 रु कमिशन च्या आमिषाने ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या मालडी – आडवली येथील तांडेल नामक विक्रेत्याला चांगलाच प्रसाद दिल्यानंतर त्याने पोपटासारखे बोलत या रॅकेट मागील सूत्रधार आणि मुख्य एजंट ची नावे उघड केली. आज सकाळी तांडेल नामक हा विक्रेता फणसवाडी परिसरात रानडुक्कराचे मटण असल्याचे सांगत विक्री करत होता.मात्र स्थानिक ग्रामस्थ हनुमंत बोंद्रे व अन्य नागरिकांनी ते मटण रानडुक्कराचे नसून पाळीव डुक्कराचे असल्याचे ओळखले आणि त्याला जाब विचारला.सुरवातीला तो मी नव्हेच चा आव आणणाऱ्या त्या विक्रेत्याला जेव्हा प्रसाद दिला तेव्हा लगेच आपली चूक कबूल करत आपण फक्त कमिशन साठी मटण विकत असल्याचे सांगत राधानगरी येथून हे मटण येत असल्याचे सांगितले. आठवड्यात रविवार, बुधवार आणि शुक्रवारी हे पाळीव डुक्कराचे मटण कणकवली तालुक्यात विक्रीला आणतात. रानडुक्कराचे मटण असल्याचे सांगून पाळीव डुक्कराचे मटण विकून ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. खवय्या ग्राहकांनी अशा फसवणुकीपासून सावध राहावे.

error: Content is protected !!