अर्जुन रावराणे विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात संपन्न
वैभववाडी (प्रतिनिधी): योगाच्या अनमोल फायद्यांबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी, दरवर्षी २१ जुन हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. वैभववाडीत अर्जुन रावराणे विद्यालय येथे सकाळच्या सत्रात योग दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी विविध प्राणायाम प्रकार व योगासने यावेळी सादर केली. योगाचे दैनंदिन जीवनातील महत्व विद्यार्थ्यांना यावेळी पटवून सांगण्यात आले. योगासनामुळे विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक आणि मानसिक शिस्त अंगी बाणवते असे मत संस्था कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी विद्यार्थ्यांशी बोलताना व्यक्त केले. दररोज योगाभ्यास केल्याने तुमच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो असे मत क्रीडा शिक्षक एस.टी.तुळसणकर यांनी व्यक्त केले. प्रशालेचे योग शिक्षक व्ही.एस. मरळकर व आर.बी.चौगूले यांनी योग प्रात्यक्षिके सादर केली. यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, मुख्याध्यापक बी.एस.नादकर., योग शिक्षक, वैभववाडी महिला पतंजलि योग समितीच्या तहसील प्रभारीअध्यक्षा मानसी सावंत, महामंत्री विद्या पाटील, संघटनमंत्री श्रावणी रावराणे, संपर्कमंत्री रुपाली रावराणे, स्वराली कोलते, प्राची सावंत व इतर पदाधिकारी, प्रशालेचे सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.














