जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
खारेपाटण (प्रतिनिधी): स्वातंत्र्य सैनिक लक्ष्मण राव जाधव यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या सोनवडे या जन्म गावी एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. सोनवडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलांना यावेळी शालोपयोगी वस्तुंचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी शिक्षण तज्ञ महिपाल धुरी, बॅ नाथ पै सेवांगणाचे कार्यवाह दिपकजी भोगटे अध्यक्ष स्थानी होते, पत्रकार संजय परब प्रमुख पाहुणे होते, साने गुरुजी मंचाचे रमेश तांबे हे खास मुंबई वरून आले आणि त्यांनी मुलांना गोष्टी सांगुन आणि गाणी म्हणत हस्ते खेळतं ठेवून कार्यक्रमात रंगत आणली. या कार्यक्रमासाठी गावच्या सरपंच मान. सौ.नाजुका सावंत, लक्ष्मण बाबांच्या तीनही कन्या सिंधु नलावडे , ऊषा वेंगुर्लेकर आणि नम्रता जाथव या उपस्थित होत्या. तसेच बाबांचे जावई जगदीश नलावडे, नितीन वेंगुर्लेकर, पंकज वडनेरे यांचेसहनातेवाईक अण्णा गुराम, जयेश पवार आणि दादा धुरी व गावातील प्रतिष्ठित नागरिक यावेळी उपस्थित होते. साथी लक्ष्मण जाधव हे स्वातंत्र्य सैनिक होते, परळ मुंबई येथे जनता दलाचे ते नगरसेवक होते. आणिबाणी मधे बडोदा डायनामाईट खटल्या अंतर्गत त्यांना फाशीची शिक्षा सुनावली गेली होती. काल त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या जन्मगावी कुडाळ येथील सोनवडे तर्फ हवेली येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तुंचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन नम्रता जाधव आणि आभार प्रदर्शन जगदिश नलावडे यांनी केले.












