मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेसचं उद्या लोकार्पण, आठवड्यातून तीन वेळा धावणार

ब्युरो न्युज (सिंधुदुर्ग) : कोकण रेल्वे मार्गावर लवकरच वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे. उद्या म्हणजेच 27 जून 2023 रोजी मडगाव इथे कोकण रेल्वेमार्गावरील वंदे भारत एक्स्प्रेसचं लोकार्पण होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हर्च्युअली मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा कंदील दाखवणार आहेत. कोकणात होणारा पाऊस पाहता सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस आठवड्यातून केवळ तीन वेळा धावणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे. पावसाळा संपला की वंदे भारतचं वेळापत्रकात बद होऊन ट्रेन आठवड्यातून सहा वेळा धावेल, असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं. रविवारी ही ट्रेन बंद असेल. वंदे भारत एक्स्प्रेस ही सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी मुंबईहून धावेल. तर मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी ही ट्रेन गोव्यावरुन धावेल. ही ट्रेन सीएसएमटी स्टेशन, मुंबईवरुन सकाळी 5.32 वाजता सुटेल आणि मडगाव स्टेशन, गोव्याला दुपारी 3.30 वाजता पोहोचेल. हा प्रवास दहा तासांचा असेल.तर परत येताना ही ट्रेन मडगावहून दुपारी 12.20 वाजता निघेल आणि मुंबईला रात्री 10.25 वाजता पोहोचेल. हा प्रवास देखील दहा तासांचा असेल.तर मान्सून गेल्यानंतर या ट्रेनचा वेग वाढवला जाईल आणि 586 किमी अंतर केवळ 7 तास 50 मिनिटांत कापेल. यादरम्यान ट्रेनला अकरा थांबे असतील. सध्या कोकण रेल्वे मार्गावर तेजस एक्स्प्रेस ही वेगवान ट्रेन धावत आहे. ही ट्रेन 586 किमी अंतर 8 तास 50 मिनिटात पार करते. त्यामुळे वंदे भारत एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्यांनाचा एक तास वाचणार आहे.

error: Content is protected !!