खारेपाटण (प्रतिनिधी): खारेपाटण येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना कक्ष आणि आजीवन अध्ययन व विस्तार विभाग यांच्या वतीने लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती म्हणजेच सामाजिक न्याय दिन मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.डी. कांबळे यांच्या अध्यक्षतेखलील साजरा करण्यात आला. परस्परात शांतता व समृद्धीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याकरिता ‘सामाजिक न्याय’ म्हणून एक मूल्य जगात आहे. हे मूल्य जपण्याच्या उद्देशाने दरवर्षी २६ जून या दिवशी “सामाजिक न्याय दिन” साजरा केला जातो. २६ जून हा शाहु महाराजांचा जन्म दिवस महाराष्ट्र शासनाने २००६ पासुन”सामाजिक न्याय दिन” म्हणून साजरा करण्याचे घोषीत केले आहे. “राजर्षी छत्रपती शाहू महाराज लोककल्याणकारी राजा होते. बहुजनांना शिक्षण, जातिभेद निर्मूलन, नोकऱ्यांमध्ये आरक्षण आणि स्त्रीमुक्तीसाठी कायदे करणारे सुधारणावादी समाजसुधारक होते. तसेच सर्व सामान्यांचा विचार करणारे सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष म्हणजे राजर्षी शाहू महाराज तसेच मुलभूत स्वरूपाची क्रांती झाली पाहिजे ही अपरिहार्यता जाणून कार्य महाराजांनी कार्य केले, असे प्रतिपादन प्रा.रश्मी देसाई यांनी केले. माणसाला माणूस समजण्याची शिकवण देणारी यंत्रणा म्हणजे शाहू महाराज असे मत प्रा.तानाजी गोदडे यांनी व्यक्त केले.समाज समताधिष्ठीत होण्यासाठी शैक्षणिक, सांस्कृतीक, सामाजिक विचारांना गती देणारा लोक राजा होय, असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आत्माराम कांबळे यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले. या प्रसंगी खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आत्माराम कांबळे, राष्ट्रीय सेवा योजना कक्ष सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक तथा महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना कक्ष कार्यक्रम अधिकारी व महाविद्यालयीन कर्मचारी समन्वयक वसीम सय्यद, सहा.प्रा.डॉ.वंदना शिंदे-व्हटकर, सहा.प्रा.तानाजी गोदडे, सहा.प्रा.गजानन व्हंकळी, सहा.प्रा.प्रजोत नलावडे, सहा.प्रा.शार्मिन काझी, सहा.प्रा.मंगल परब, व प्राध्यापकेतर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजना कक्ष विद्यार्थी प्रतिनिधि कु. अमृता जगताप, कु. आरती पवार, कु. सूरज गोठणकर, कु. सूरज पांचाळ व कु. गौरव राठोड,कु. गौरव सुतार आदी राष्ट्रीय सेवा योजना कक्ष स्वयंसेवकांनी उत्साहपूर्ण सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु.राहुल कांबळे पाहुण्यांची ओळख कु.आरती पवार, आभार प्रदर्शन प्रा. डॉ. वंदना शिंदे-व्हटकर व सुत्रसंचालन कु.साक्षी चव्हाण यांनी केले.