आचरा (प्रतिनिधी): मालवण तालुक्यातील पळसंब येथील श्री जयंती देवी कला, क्रिडा मंडळाच्यावतीने 1 जुलै 2023 रोजी, सकाळी 10 वाजता श्री. जयंतीदेवी रवळनाथ मंदिर व पंचायतन परिसर येथे वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.विद्याधर तायथेटे ( कणकवली ), विश्वनाथ गोसावी ( तालुका कृषी अधिकारी मालवण ), संजय गोसावी ( पंचायत समिती मालवण ), डॉ . सिध्देश सकपाळ ( त्रिंबक ) शिंदे (वन क्षेत्रपाल मालवण ) उपस्थित रहाणार आहेत तरी देवस्थान मानकरी, देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी, ग्रामपंचायत पळसंब तसेच भजन मंडळ, क्रिकेट मंडळ, गावातील सर्व रहिवाशी, महिला वर्ग, प्रतिष्ठित व्यक्ती, बाल गोपाळ यांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री. जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रिडा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.