दिल्ली-मुंबईत-६२ वर्षांनंतर मान्सून एकाचवेळी

मुंबई आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा

ब्युरो न्युज (सिंधुदुर्ग) : जोरदार वारा आणि मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस उत्तर पश्चिम भारतासह जवळपास संपूर्ण देशात कोसळत आहे.त्यामुळे तापमानात मोठी घसरण होऊन दमट उन्हाळ्यापासून मोठा दिलासा मिळाला. देशाची राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबईत ६२-वर्षांनंतर मान्सून पोहोचला आहे. मान्सून दिल्लीत दोन दिवस आधी तर मुंबईत दोन आठवडे उशिरा दाखल झाला. त्याच्या प्रभावामुळे दिल्ली-एनसीआरमध्ये शनिवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस झाला. गेल्या-२४-तासात-४०-ते ८०-मिमी पावसाची नोंद झाली आहे.तर मुंबईत-८६ ते-१७६.१-मिमी पावसाची नोंद झाली आहे.पंजाब हरियाणा आणि चंदीगडच्या बहुतांश भागातही मुसळधार पाऊस झाला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र आणि गुजरातच्या कच्छ भागात चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्राच्या अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने MD-वर्तवला आहे. IMD-ने रविवारी सांगितले की मुंबई आणि मध्य महाराष्ट्रासह किनारपट्टी भागात पुढील-४८-तासांत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने रविवारी सांगितले की-२४ तासांत दिल्ली,उत्तर प्रदेश,उत्तराखंड ते आसाम आणि ईशान्येकडील सर्व राज्ये, कर्नाटक,केरळ, तामिळनाडू,तेलंगणा, गोवा आणि महाराष्ट्रात बहुतांश भागात मुसळधार पाऊस झाला आहे.मध्य प्रदेश,गुजरात राजस्थान, पंजाब हरियाणा बिहार, छत्तीसगड,पश्चिम बंगाल, जम्मू-काश्मीर आणि झारखंडमध्ये मुसळधार ते अतिवृष्टी झाली. आयएमडीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डी एस पै यांनी सांगितले की,यापूर्वी-दि:-२१ जून-१९६१-रोजी मान्सून दिल्ली आणि मुंबईत एकाच वेळी पोहोचला होता.मान्सून साधारणपणे-दि:-२७ जून-पर्यंत दिल्ली आणि दि:-११-जून-२०२३-पर्यंत मुंबईत पोहोचतो. जलद गतीने पुढे जाणारा मान्सून रविवारपासून मुंबईसह महाराष्ट्रातील उर्वरित भाग,मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश,दिल्ली, गुजरात,राजस्थान, हरियाणा आणि जम्मू-काश्मीर आणि लडाखचा काही भाग व्यापण्याची शक्यता आहे, असे आयएमडीने एका निवेदनात म्हटले आहे.नैऋत्य मान्सून सोमवारपर्यंत येत्या दोन दिवसांत पश्चिम आणि उत्तर भारतातील आणखी काही भागात मान्सूनच्या आगमनासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचेही हवामान खात्याने म्हटले आहे.पश्चिम आणि उत्तर भारतातील आणखी काही भागात मान्सून पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे दिल्लीत पारा-०८-अशांनी घसरला दिल्ली-एनसीआरमध्ये पावसामुळे कमाल तापमान-२९-अंश सेल्सिअसपर्यंत घसरले. शनिवारच्या तुलनेत ते-०८ अंश कमी आहे. किमान तापमान-२३.१ अंश सेल्सिअस नोंदवले गेले,जे सामान्यपेक्षा पाच अंशांनी कमी आहे. दिल्लीच्या मुख्य सफदरजंग वेधशाळेत रविवारी सकाळी-८.३० पर्यंत-४८.३-मिमी पावसाची नोंद झाली. सोमवारी जोरदार वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावर्षी सामान्य पावसाची शक्यता वाढली हवामान खात्याने सांगितले की, एल निनोचा प्रभाव असला तरी,यावर्षी देशात सामान्य मान्सून अपेक्षित आहे.शेतकऱ्यांसाठी हा दिलासा आहे,कारण ५२%टक्के लागवडीखालील जमीन सिंचनासाठी पावसाळ्यावर अवलंबून आहे.

error: Content is protected !!