डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रामीण व शहरी विकास प्रकल्पा तर्फे नेत्र तपासणी शिबीर यशस्वी

खारेपाटण (प्रतिनिधी): समता शिक्षण संस्था पुणे संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रामीण व शहरी विकास प्रकल्प मोराणे अंतर्गत दि. २७ जुन २०२३ रोजी मोराणे (श्रीराम मंदिर) येथे नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिरात जीविका फाऊंडेशनचे जिवीका ऑप्टीकल्स अँड आय केअर सेंटर, धुळे यांच्या मार्फत आधार प्रकल्पातील कुंडाणे आणि मोराणे येथील वृद्धांना आणि मोराणे गावातील नागरिकांना अल्पदरात तपासणी उपलब्ध करण्यात आली. शिबिराचा लाभ गावातील ६७ प्रकल्पातील वृद्ध व नागरिकांनी घेतला. गणेश पाटील (सचिव,जीविका फाऊंडेशन नेत्र तपासणी केंद्र, धुळे), किरण कुवर, डॉ. सालीम शेख, राहुल दाभाडे, ऋषी ठाकरे (सामाजिक कार्यकर्ते), गुलाब गर्दे हे उपस्थित होते. तसेच गावातील ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग उल्लेखनीय होता. नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन प्रकल्पातील लाभार्थी बनुबाई सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. हे शिबिर यशस्वी होण्यासाठी ग्रामीण विकास प्रकल्पाचे प्रा. रचना अडसुळे (समन्वयक), सुनिता पाटील (प्रकल्प अधिकारी), गणेश उफाडे (सोशल वर्कर) यांनी प्रयत्न केले.

error: Content is protected !!