माजी ऑर्डीनरी सुभेदार मेजर संतोष कदम यांचे वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेच्या वतीने स्वागत
वैभववाडी (प्रतिनिधी): वैभववाडीचे सुपुत्र व अर्जुन रावराणे विद्यालयाचे माजी विद्यार्थी भारतीय सैन्य दलात ऑर्डीनरी सुभेदार मेजर म्हणून आर्मी मध्ये तीस वर्षे यशस्वी सेवा बजावून सेवानिवृत्त झालेले संतोष गोविंद कदम यांनी आज अर्जुन रावराणे विद्यालयाला भेट दिली. या निमित्ताने वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी कदम यांचे पुष्पगुच्छ देऊन प्रशालेमार्फत स्वागत केले. यावेळी कदम यांनी प्रशालेतील एन.सी.सी.च्या विद्यार्थ्यांना सैनिकी प्रशिक्षण, परीक्षा याबाबत थोडक्यात मार्गदर्शन केले आपल्या प्रदीर्घ सेवेतील अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले व विद्यार्थ्यांनी शालेय जिवनात स्वयंशिस्त व राष्ट्राभिमान अंगी बाळगणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, मुख्याध्यापक बी.एस.नादकर, माजी ऑर्डीनरी सुभेदार मेजर संतोष कदम, एन.सी.सी. विभाग प्रमुख एस.टी.तुळसणकर, प्रशालेचे सर्व शिक्षक व एन.सी.सी.विद्यार्थी उपस्थित होते.












