मंदिर जीर्णोद्धारावेळी केली आहे विठ्ठल रखुमाईची मूर्ती स्थापना
चौके ( अमोल गोसावी ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काळसे या निसर्गाने नटलेल्या गावातल्या प्राचीन, जागृत श्री देवी माऊली च्या मंदिरा चा जिर्णोद्धार या वर्षीच करण्यात आला असून त्यावेळी श्री. देवी माऊली मंदिरात श्री गणेश आणि श्री विठ्ठल रखूमाई च्या मूर्तीची देखील स्थापना करण्यात आली . त्यामुळे उद्या गुरुवार २९ जून रोजी मंदिरात आषाढी एकादशी साजरी केली जाणार आहे. काळसे गावात तसेच आजूबाजूच्या गावात विठ्ठल मंदिर नसल्याने एकादशी सारख्या अतिशय महत्त्वाच्या धार्मिक उत्सवा साठी ग्रामस्थांना दूर च्या गावी पूजाविधी ,दर्शना साठी जावे लागत असे . आता गावातच पांडुरंगाचे दर्शन होणार आहे .
विठ्ठल रखुमाई मूर्तीच्या स्थापने नंतर पहिल्याच येणार्या देवशयनी (आषाढी ) एकादशी चा धार्मिक उत्सव अतिशय पारंपरिक पद्धतीने ,भक्तिभावाने साजरा करण्यात येत आहे . त्यानिमित्त माऊली मंदिरात सकाळी ५ : ३० वाजता काकड आरती , सकाळी ८ ते ११ महाभिषेक व पंचामृत सहीत मूर्तीपूजा त्यानंतर सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत आरती व महाप्रसाद , सायंकाळी ४ वाजता श्री सिताराम परब ( दाजी ) यांचे हरिपाठ वाचन आणि सायंकाळी ७ : ३० वाजल्यापासून स्थानिक मंडळांची भजने असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तरी सर्व ग्रामस्थ तसेच पंचक्रोशीतील समस्त विठ्ठल भक्तांना सदर सोहळ्यात सहभागी होऊन पांडुरंगाचे दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री देवी माऊली मंदिर जिर्णोद्धार निधी संकलन समिती, मुंबई ,श्री देवी माऊली कला क्रिडा मंडळ ,काळसे व माऊली मंदिर व्यवस्थापन समिती,काळसे यांच्या वतीने करण्यात आले आहे.












