अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेचे बक्षिस वितरण संपन्न
देवगड (प्रतिनिधी): आजच्या टेक्नोसेव्ही जमान्यात अँड्रॉईड मोबाईल च्या एका क्लिकवर सगळे जग पाहता येते. डिजिटल गॅजेट चा वापर योग्य पद्धतीने केल्यास निश्चितच अभ्यासासोबत व्यक्तिमत्व विकासासाठी फायदा होतो. विद्यार्थ्यांनी सोशल मीडिया आणि डिजिटल गॅजेटच्या योग्य वापराने आपली प्रगती करावी , अंमली पदार्थांपासून आयुष्यात दूर रहावे असे आवाहन देवगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी केले. जागतिक अंमली पदार्थ दिन विरोधी दिनानिमित्त देवगड पोलीस ठाण्याच्या वतीने तालुक्यातील हायस्कुलमधील विद्यार्थ्यांसाठी आयोजित चित्रकला स्पर्धेचे वितरण शेठ म.ग.हायस्कुल देवगड येथे करण्यात आले.त्यावेळी बगळे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रशालेचे मुख्याध्यापक, सहकारी शिक्षक, पोलीस कर्मचारी उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना पोलीस निरीक्षक बगळे यांनी विद्यार्थ्यांना सायबर क्राईम द्वारे होणारी फसवणूक, सायबर गुन्हेगारी, पोलीस विभागातील कायदे, अंमली पदार्थ आणि त्यांच्या सेवनाने शरीरावर होणारे दुष्परिणाम, तसेच अंमली पदार्थ विरोधी बाबत चे कायदे याबाबदत सविस्तर मार्गदर्शन केले. देवगड पोलीस ठाण्याच्या वतीने जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत शिरगाव हायस्कूल, श्रीराम मोरेश्वर गोगटे हायस्कूल जामसंडे, शेठ म.ग.हायस्कूल देवगड, महात्मा गांधी हायस्कूल तळेबाजार, अ. कृ. हायस्कूल वाडा, शांताराम विष्णू केळकर हायस्कूल मोंड, फणसगाव हायस्कूल चे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.या स्पर्धेत प्रथम क्रमांक तनिष प्रवीण वारीक गोगटे हायस्कूल जामसंडे, द्वितीय क्रमांक आर्या विनोद चौगुले, शेठ म ग हायस्कूल देवगड, तृतीय क्रमांक सिद्धी मंगेश राऊळ ,अ कृ हायस्कूल वाडा यांनी मिळवला होता. तसेच मोरेश पंडित सोहनी उमा मिलिंद हायस्कुल देवगड यांनी मिळवला होता.या सर्व विजेत्यांना आज मान्यरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले.












