आ. मुश्रीफांना मंत्रिमंडळात सामावून घेतल्याने समजितसिंह घाटगे नाराज

प्रतिनिधी (रोहन भिऊंगडे): कोल्हापूर,आ.हसन मुश्रीफ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्याने कोल्हापूरचे ग्रामीण भाजप जिल्हाध्यक्ष समजितसिंह घाटगे नाराज झाल्याची माहिती मिळतीय. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून समजितसिंह घाटगे हे नॉट रिचेबल असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कोल्हापुरात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. आ. हसन मुश्रीफ यांनी शपथ घेण्याआधीच समजितसिंह घाटगे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती आणि त्यांना सोबत घेऊ नका असे सांगितले होते. तरीही आ. मुश्रीफांना मंत्रिमंडळात सामावून घेतल्याने समजितसिंह घाटगे हे नॉट रिचेबल झाले आहेत. गेल्या 10 वर्षांपासून कोल्हापुरात आ. मुश्रीफ आणि समजितसिंह घाटगे यांच्यात राजकीय संघर्ष सुरु आहे. असे असताना आ.मुश्रीफ यांना सोबत घेतल्याने माझी राजकीय कारकिर्द कशी चालणार अशा प्रकारचा सवाल घाडगे यांनी उपस्थित केला होता. राष्ट्रवादीचे आमदार सोबत येत असतील तर घ्या पण मंत्रिपद देऊ नका अशा प्रकारची अटही घाटगे यांनी पक्षश्रेष्ठींसमोर ठेवली होती. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी हसन मुश्रीफ यांना मंत्रिपद दिलं आहे. त्यामुळे समजितसिंह घाटगे प्रचंड नाराज झालेले आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांनी अशा प्रकारचे कॅम्पेनिंग सोशल मीडियावर सुरु केली आहे.

error: Content is protected !!