वाढदिवस युवासेना जिल्हाप्रमुख सुकांत वरुणकर यांचा…धमाका सामाजिक उपक्रमांचा

सुकांत वरुणकर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत शैक्षणिक साहित्य वाटप, रक्तदान शिबिर, स्मार्ट टीव्ही लोकार्पण, वृक्षारोपण कार्यक्रमांचे आयोजन

खारेपाटण (प्रतिनिधी): खारेपाटण गावचे सुपुत्र ,युवा उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते तसेच सिंधुदुर्ग जिल्हा युवा सेना जिल्हा प्रमुख श्री सुकांत वरुणकर यांच्या वाढ दिवसानिमित्त 9 जुलै रोजी खारेपाटण विभागात विविध सामाजिक शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे, विधानसभा संघटक संदेश पटेल, युवा उद्योजक रुपेश सावंत,खारेपाटण सरपंच प्राची इस्वलकर, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर, कणकवली तालुकाप्रमुख भूषण परुळेकर, देवगड तालुकाप्रमुख अमोल लोके, विलास साळसकर, वैभववाडी तालुकाप्रमुख संभाजी रावराणे, राजापूर तालुकाप्रमुख अश्फाक हाजू, किसन मांजरेकर, कणकवली उपतालुकाप्रमुख मंगेश गुरव, लियाकत काझी आदी उपस्थित राहणार आहेत. खारेपाटण विभागात सामाजिक कार्यकर्ते व युवा उद्योजक म्हणून ओळख असणारे सुकांत वरुणकर यांनी नुकताच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला असून पक्षाने त्यांच्याकडे युवा सेना जिल्हाप्रमुख पदाची मुख्य जबाबदारी दिली असून एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून देखील श्री सुकांत वरुणकर खारेपाटण विभागात प्रसिद्ध आहेत. “आपण समाजाचे काही तरी देणं लागतो.या उद्दात भावनेतून आपला वाढदिवस हा गरजवंताच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सत्कारणी लागावा.म्हणून काही सामाजिक,शैक्षणीक उपक्रम वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात येत असल्याचे श्री सुकांत वरुणकर यांनी सांगितले. दरम्यान श्री सुकांत वरुणकर यांच्या वाढदिवसानिमित्त खारेपाटण विभगातील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या एकूण 60 गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत स्कुल बॅग, वह्या, पॅड, पाणी बॉटल आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप जि.प.केंद्र शाळा खारेपाटण क्र.1 येथे सकाळी 11 वाजता करण्यात येणार आहे. तसेच खारेपाटण येथील शेठ नवीनचंद्र मफतलाल हायस्कूल येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन देखील करण्यात आले असून सकाळी 9 वाजता रक्तदान शिबिराचे उदघाटन होणार आहे.याबरोबरच मुंबई – गोवा महामार्गावर तळेरे ते खारेपाटण दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा सुमारे १०० पेक्षा अधिक आंबा काजू झाडे लावून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात येणार आहे. खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सुकांत वरुणकर यांच्या वतीने मोफत स्मार्ट टि.व्ही.लोकार्पण सकाळी 10 वाजता करण्यात येणार आहे. सेवाभावी सामाजिक उपक्रमांनी साजरा होणाऱ्या या वाढदिनी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सुकांत वरुणकर मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!