सावंतवाडी (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग पाटबंधारे प्रकल्प बांधकाम तिलारी चराठे कार्यकारी अभियंता म्हणून विनायक बाबुराव जाधव यांनी पदभार स्वीकारला तर रोहीत कोरे यांची सांगली येथे बदली झाली आहे. सिंधुदुर्ग पाटबंधारे प्रकल्प बांधकाम कार्यकारी अभियंता रोहित कोरे यांची ताकारी म्हैसाळ उपसा सिंचन प्रकल्प सांगली येथे त्याच पदावर बदली झाली आहे. तर अलोरे रत्नागिरी गुण नियंत्रण कार्यकारी अभियंता म्हणून पदभार सांभाळणारे विनायक बाबुराव जाधव यांची सिंधुदुर्ग पाटबंधारे प्रकल्प बांधकाम कार्यकारी अभियंता म्हणून पदभार स्वीकारला आहे. त्यांनी पुर्वी तिलारी आंतरराज्य जलविद्युत प्रकल्पात कोनाळकट्टा येथे काम केले आहे.
तिलारी प्रकल्प कार्यकारी अभियंतापदी विनायक जाधव












