कुडाळ न्यायाधीश ढोरे यांनी सुनावली शिक्षा
सरकारी वकील मेघा परब यांचा यशस्वी युक्तिवाद
कुडाळ ( अमोल गोसावी ) : शिवीगाळ करून बांबू च्या काठीने हातपाय तोडण्याची धमकी दिल्याच्या खटल्यातील आरोपी लता प्रमोद राणे आणि निळकंठ सुरभा राणे या दोन्ही आरोपिन कुडाळ प्रथम वर्ग सह न्यायदंडाधिकारी पी आर ढोरे यांनी 1 वर्ष मुदतीच्या शिक्षेसह रोख 5 रुपयांचा दंड ठोठावला. दंडाची रक्कम प्रत्येकी अडीच हजार अशी विजया परब आणि वैशाली परब यांना नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले आहेत.या खटल्यात सरकारी वकील मेघा परब यांनी सरकार पक्ष्यातर्फे यशस्वी युक्तिवाद केला. कुडाळ सांगिरडेवाडी येथे 7 मार्च रोजी आरोपी लता राणे आणि निळकंठ राणे यांनी साक्षीदार विजया परब हिला ढकलून थोबाडीत मारले. वैशाली परब आणि विजया परब ह्यांना बांबू च्या काठीने मारहाण करून शिवीगाळ करत हात पाय तोडण्याची धमकी दिली होती. याबाबत आरोपी लता राणे व निळकंठ राणे यांच्यावर कुडाळ पोलीस ठाण्यात आयपीसी 323, 324, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्याची सुनावणी कुडाळ येथील प्रथम वर्ग सह न्यायदंडाधिकारी ढोरे यांच्या न्यायालयात झाली. सरकारी वकील मेघा परब यांच्या यशस्वी युक्तिवादामुळे आरोपींचा गुन्हा सिद्ध झाला.












