कुडाळ (अमोल गोसावी) : कुडाळ तालुक्यातील नेरूर येथे पीयूष नेरूरकर आयोजित विशाल सेवा फाउंडेशन व भारतीय जनता पार्टी पुरस्कृत तीन दिवसीय इनडोअर बॉक्स अंडर आर्म क्रिकेट स्पर्धा २०२३ चे आयोजन सुखकर्ता हॉल नेरूर येथे करण्यात आले आहे. दिनांक ९,१० आणि ११ जुलै २०२३ या दिवशी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक २०,०००/ व आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक १०,००० व आकर्षक चषक आणि तृतीय पारितोषिक ३००० व आकर्षक चषक तसेच सामनावीर – रोख रक्कम व आकर्षक चषक, मालिकावीर – रोख रक्कम व आकर्षक चषक, उत्कृष्ट फलंदाज – रोख रक्कम व आकर्षक चषक, उत्कृष्ट गोलंदाज – रोख रक्कम व आकर्षक चषक, उत्कृष्ट शेत्र रक्षक – रोख रक्कम व आकर्षक चषक आणि उत्कृष्ट यष्टी रक्षक – रोख रक्कम व आकर्षक चषक तरी या स्पर्धेला क्रीडा रसिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी राहावे. असे आवाहन पीयूष नेरूरकर मित्रमंडळाने केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : 7083382994
नेरूर ला ९,१०, ११ रोजी इनडोअर बॉक्स अंडर आर्म क्रिकेट स्पर्धा












