12 रुपयांत चंदन रोप उपलब्ध
कणकवली (प्रतिनिधी) : राज्य शासन वन विभागाच्या दिगवळे येथील मध्यवर्ती रोपवाटिकेत वनक्षेत्रपाल राजेंद्र घुणकीकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल दळवी ,पाटीलआणि वनरक्षक गळवे , शिंदे यांनी दर्जेदार रोपवाटिका तयार केली आहे. वन विभागाच्या दिगवळे येथील या रोपवाटिकेत शास्त्रोक्त पद्धतीने साग, खैर,आवळा, काजू, शिवण, चंदन आपटा,तुळस , शेवगा,बांबू, करंज आदी प्रजातीची रोपे तयार करण्यात आली असून शासकीय दरामध्ये रोपविक्री सुरू आहे. अत्यंत दर्जेदार अशी रोपे खाजगी रोपवाटिकांपेक्षा कमी दराने दिगवळे येथील वन विभागाच्या रोपवाटिकेत विक्रीसाठी उपलब्ध आहेत. रोप खरेदीसाठी वनपाल पाटील मोबाईल नं 9307189598अथवा वनरक्षक शिंदे मोबाईल नं. 950376 9116वर संपर्क साधावा असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.












