प्रा.आ केंद्र खारेपाटणला टी.व्ही. संच प्रदान मुंबई-गोवा महामार्गावर १०० वृक्षांची लागवड
खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण गावचे सुपुत्र व युवा उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते आणि सिंधुदुर्ग जिल्हा युवा सेनेचे प्रमुख श्री सुकांत वरूणकर यांचा वाढदिवस आज सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना प्रमुख संजय आंग्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत खारेपाटण विभागात विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.
शिवसेना शिंदे गट व सुकांत वरुणकर मित्र मंडळाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वरुणकर यांच्या वाढदिवसानिमित्त खारेपाटण प्रा.आ. केंद्र येथील गरज लक्षात घेऊन येथे 32 इंच टि.व्ही. सेट रुग्णालयाला भेट देण्यात आला.याचे लोकार्पण खारेपाटण सरपंच प्राची इसवलकर यांच्या हस्ते करण्यात आले.तर खारेपाटण वृक्ष संवर्धन करण्याच्या उद्देशाने मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर दुतर्फा सुमारे १०० झाडे मान्यवरांच्या उपस्थित लावण्यात आली. सुकांत वरूणकर व खारेपाटण सिनियर कॉलेज चे प्राचार्य डॉ.ए डी कांबळे यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
या कार्यक्रमाला शिवसेना कार्यकर्ते संदेश पटेल,राजापूर तालुका शिवसेना प्रमुख आशपाक हाजू , महीला जिल्हा प्रमुख वर्षा कुडाळकर,किसन मांजरेकर,भाकर राणे,योगेश तुळसकर,अनधा रांगणेकर,कणकवली तालुका प्रमुख शरद वायगणकर,उपतालूकाप्रमुख मंगेश गुरव,भूषण परुळेकर,प्रल्हाद नारकर,निलेश तेली,चैतन्य कुडाळकर,संजय नकाशे राजू माळवदे हुसेन लांजेकर,ग्रा.पं. सदस्य गुरूप्रसाद शिंदे,सुधाकर ढेकणे, अस्ताली पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
याबरोबर खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे,विजय देसाई,सूर्यकांत भालेकर,सुधीर कुबल,अनंत गांधी, खारेपाटण प्रा.आ.केंद्राच्या वैद्यकिय अधिकारी डॉ.प्रिया वडाम,खारेपाटण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए डी कांबळे,संतोष पाटणकर,कुबल गुरुजी, खारेपाटण केंद्र शाळेचे मुख्याद्यापक प्रदीप श्रवाणकर,तेजस राऊत,विरेन चिके,प्रशांत गाठे,खारेपाटण व्यापारी असो.अध्यक्ष प्राजाल कुबल आदी मान्यवर यांनी उपस्थित राहून सुकांत वरुणकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

















