काळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाईन ; पावसाचा जोर वाढल्याने पाणी जॅकवेल मध्ये पोहोचले

आ.सतेज पाटील यांनी जाऊन केली पाहणी ; मान्यवरांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले

कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : कोल्हापूरच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आणि नागरिकांच्या स्वप्नातील असणारी थेट पाईपलाईन योजना आता पूर्णत्वास येत आहे. कोल्हापूरला शुद्ध आणि मुबलक पाणी पुरवठा व्हावा यासाठी काळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाईन योजना कार्यन्वित आहे. थेट पाईपलाईन योजना पूर्ण होत आहे. धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने पाणी जॅकवेल मध्ये पोहोचले आहे. दरम्यान, जिल्हाचे नेते मा.आमदार सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांच्या समवेत आज (रविवारी) या योजनेची प्रत्यक्षरीत्या त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.

ही थेट पाईपलाईन योजना पूर्णत्वास नेण्यासाठी आमदार सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांनी शासकीय स्तरावर अथक प्रयत्न व पाठपुरावा केला होता. यामुळेच ही योजना आता आता पूर्णत्वास येत आहे.

याप्रसंगी आमदार ऋतुराज पाटील,आमदार जयश्री जाधव,महापालिकेचे जल अभियंता नेत्रदीप सरनोबत, प्रकल्प अधिकारी राजेंद्र माळी, माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, संदीप नेजदार, भूपाल शेटे, मधुकर रामाणे, राजेंद्र साबळे, राजेंद्र लाटकर, सुनील पाटील, संदीप कवाळे, सचिन पाटील, दिग्विजय मगदूम, अशपाक आजरेकर, मोहन सालपे, श्रावण फडतारे, संजय लाड, सागर येवलुजे, गोकुळचे संचालक राजेंद्र मोरे, काळम्मावाडीचे माजी सरपंच संदीप डवर, बाजीराव चौगुले, चंद्रकांत चौगुले, जे.के. पाटील, वैभव तहसीलदार आदींसह अन्य पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

error: Content is protected !!