मुंबई ( ब्युरो ) : निसर्गाने आपल्याला बरेच काही दिलं आहे निसर्गाचेआपल्यावरील उपकार पाहिले तर अगणित आहेत आणि त्या निसर्गाच्या सर्वधना साठी आज कोकण कट्टा मुंबई तसेच वासल्य ट्रस्ट मुंबई तसेच चित्रकार रुपेश पाटील यांच्या सहकार्याने उरण येथील नव्याने तयार झालेल्या कोमणादेवी ऑक्सिजन पार्क येथे वृक्षारोपण करण्यात आले, सारडे हे निसर्गरम्य ठिकाण आहे आणि तिथे दरवर्षी येण आम्हास नक्की आवडेल असे मत कोकण कट्टा मुंबई चे सर्व सहकारी वर्गाने व्यक्त केलं सर्वाचे स्वागत हे उपेंद्र ठाकूर सर याच्या शुभ हस्ते करण्यात आले,यावेळी कोकण कट्टा चे संस्थेचे संस्थापक अजितदादा पितळे, खजिनदार सुजित कदम, सदस्य श्रीपाद डंके, विवेक वैद्य, दीपेश सावंत, चित्रकार रुपेश पाटील सर, सारडे ग्रामपंचायतीचे सरपंच रोशन पाटील,सुयश क्लासेस आवरे चे निवास गावंड सर, श्री नंदाई प्रतिष्ठान चे डॉ. हिराचंद पाटील, उपेंद्र ठाकूर सर,विलास पाटील सर, प्रशांत म्हात्रे सर, सदाबहार दोस्ती ग्रुप चे हरीश म्हात्रे, तुकाराम गावंड,सचिन पाटील आम्ही पिरकोणकर समूहाचे चेतन गावंड,समीर गावंड, कोरिओग्राफर सचिन पाटील, शैलेश पाटील, रोहित ठाकुर, हरिश्चंद्र म्हात्रे,शिवकुमार म्हात्रे, महेश पाटील,मंगेश पाटील,दर्शना म्हात्रे,रुपाली म्हात्रे, रिया म्हात्रे, दानिश, ओम ,निल,रूद्र, श्रिवेद, सई, सारा, बच्चे कंपनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन कार्यक्रम संपन्न झाला
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवास गावंड सर, तर आभार प्रदर्शन तुकाराम गावंड यांनी केले तसेच
सारडे विकास मंच अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे यांनी सर्व मान्यवर आणि सहकारी वर्गाचे आभार मानले आणि कार्यक्रमाची सांगता झाली
कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सारडे विकास मंच च्या सर्व शिलेदारानी विशेष मेहनत घेतली












