कोल्हापूर (प्रतिनिधी) : क्रांतीगुरु लहुजी (वस्ताद) प्रतिष्ठान तर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना स्मृतिदिनानिमित्त राजारामपुरी मातंग वसाहत येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अँड.दत्ताजीराव कवाळे व राष्ट्रीय खेळाडू डॉ.प्राजक्ता सूर्यवंशी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी
लोकशाहीर आण्णाभाऊनी बालपणापासून त्यांच्या वाट्याला अत्यंत हलाखीचे जीवन आले.ओझी वाहिली, कोळसा वाचला, गिरणीत झाडू मारला. पोटासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला. पण ते मागे हटले नाहीत. संकटाला संधी समजून त्यांनी लढाऊ वृत्तीने त्यावरती मात केली. आण्णा भाऊ साठे संकटात खचून जाणारे नव्हते. तर संकटाच्या नरडीवर पाय देऊन यशाची शिखरे गाठणारे आण्णा भाऊ होते असे मनोगत अँड.दत्ताजीराव कवाळे व्यक्त केले.
यावेळी सुप्रसिद्ध उद्योगपती निवास सूर्यवंशी,प्रतिष्ठानचे अध्यक्ष अक्षय साळवे, शहराध्यक्ष राहुल गणेश आचार्य,प्रशांत अवघडे, अजय कांबळे,विनोद जगताप,शंकर बल्लाळ,आदि उपस्थित होते.











