आंबोली नंतर करूळ घाटात कोसळली दरड ; वाहतूक खोळंबली

वैभववाडी (प्रतिनिधी) : गेली चार दिवस तालुक्यात जोरदार पाऊस सुरु आहे. अतिवृष्टीत करुळ घाटात रस्त्यावर दरड कोसळली. यामुळे वाहातूक काहीकाळ विस्कळीत झाली होती. जेसीबीच्या सहाय्याने पोलिसांनी दरड बाजूला केल्यानंतर वाहातूक सुरळीत केली. शनिवारी सकाळी ही घटना घडली.

तालुक्यात शुक्रवारी पावसाचा जोर काहीसा ओसरला होता. परंतु शनिवारी मध्यराञीपासून पावसाचा जोर पुन्हा वाढला असून दिवसभर पावसाची जोरदार बॕटींग सुरु होती. सह्याद्रीपरिसरात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे करुळ घाटात गगनबावड्यापासून २ कि.मी. अंतरावर भला मोठा दगड रस्त्यावर आला. दगड रस्त्यावर मधोमध असल्यामुळे वाहातूक विस्कळीत झाली होती. पोलिसांना माहीती मिळताच पोलिस हवालदार राहुल पवार, रमेश नारणवर यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जेसीबी बोलावून रस्त्यावरचा दगड बाजूला करुन वाहातूक सुरळीत केली. नदीनाले दुथडी भरुन वाहत आहेत. तर अनेक छोटे काॕजवे व मो-यां पाण्याखाली गेल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत आहे.

एडगाव रामेश्वरवाडी येथील काॕजवे पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून येजा करावी लागत आहे. शुक्रवारी रामेश्ववरवाडी येथील अशोक गणपत रावराणे यांचे निधन झाले. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमिकडे जाण्यासाठी दुसरा रस्ता नसल्यामुळे ग्रामस्थांना कंभरभर पाण्यातुन दोरीच्या सहाय्याने प्रेतयाञा घेऊन जावे लागले.

error: Content is protected !!